सईची उंच भरारी …. आता विनोदाच्या शहरात ..

सईची उंच भरारी …. आता विनोदाच्या शहरात ..

अनुबंध या मराठी मालिकेतून अभिनयाची खरी सुरुवात करणारी आणि सदैव नवनवीन गोष्टीने चर्चेत राहणारी सई आता स्टॅंड-अप कॉमेडी करतेय. अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा सईने उमटवला आहे. मराठी चित्रपट, मालिका, तसेच हिंदी चित्रपट यातही आपली वेगळी छबी सईने रसिक प्रेक्षकांसमोर उभी केली आहे.

सई ताम्हणकर नेहमी नव-नवे ट्रेंड्स घेऊन येत असते. बाकी स्टार्स जे करत नाहीत, ते काहीतरी वेगळं करण्याचा विचार सई करते. मालिका-चित्रपटाचे क्षेत्र पादाक्रांत केल्यावर सईने एक कुस्ती टिम खरेदी केली. त्यानंतर ती आता लवकरच एका वेबसीरिजमधूनही दिसणार आहे.

सईने आजवर बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. त्यापैकी दुनियादारी हा तिचा चित्रपट बराच गाजला. चित्रपट क्षेत्राबरोबर सई तिच्या खाजगी आयुष्याबाबतही चर्चेत असते. सईला अतिशय बोल्ड अभिनेत्री म्हटल्यास काही हरकत नाही. सई खूप बिनधास्त आहे. सई तिची हटके अदा घेऊन एक नवीन वेबसिरीज करत आहे. डेट विथ सई म्हणून. गंभीर, बोल्ड, सालस, भूमिका साकारणारी सई विनोदाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. स्टँड-अप कॉमेडी करण्याचे एक हेही कारण असू शकते. ती सध्या नवीन मराठी वाहिनी सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कॉमेडी शो जज करत आहे. त्यामुळे तिची विनोदाची आवड अजूनच दृढ झाली असणार यात काही शंका नाही.

तसे पाहता स्टँड-अप कॉमेडी क्षेत्रात आजपर्यंत कोणी सुपरस्टारने प्रवेश केला नाही. नविन कलाकराच ह्या क्षेत्राकडे वळतात आणि ह्या क्षेत्रात नाव कमावल्यावर मग ते अभिनय क्षेत्राकडे जातात. पण सईचं हेच तर वैशिष्ट्य आहे. तिला नाविन्याची ओढ आहे आणि म्हणूनच ती काहीतरी नवं करायचा विचार करतेय.

 

READ ALSO : ‘मुळशी पॅटर्न’ – समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते

सई ताम्हणकरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ अपलोड करत ह्या आपल्या नव्या स्टँडअप कॉमेडीच्या प्रयोगाची माहिती आपल्या चाहत्यांना दिलीय.

सईला स्टॅंडअप कॉमेडियन्सबद्दल आणि ह्या क्षेत्राबद्दल खूप आदर आहे. तिने तिच्या करीयरमध्ये काही सिनेमांमध्ये विनोदी भूमिकादेखील केल्या आहेत. पण स्टॅंडअप कॉमेडी खूप वेगळी असते. रंगमंचावर अभिनय करण्याची नशा काही औरच असते. म्हणून हा नवा अनुभव तिला घ्यायचा आहे.

रविवारी संध्याकाळी ठाण्यामध्ये सई ताम्हणकरने आपला पहिला स्टॅडअप कॉमेडी शो केला. सई तुला तुझ्या ह्या नवभरारीसाठी फिल्मिभोंगा मराठी कडून खूप खूप शुभेच्छा …

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author