परश्या आर्चिच्या मुलाची काळजी करणाऱ्यांना खुश खबर.. ही अभिनेत्री घेणार त्यांच्या मुलाची काळजी – सैराट २ मध्ये..!!

परश्या आर्चिच्या मुलाची काळजी करणाऱ्यांना खुश खबर.. ही अभिनेत्री घेणार त्यांच्या मुलाची काळजी – सैराट २ मध्ये..!!

 

कोणताही सिनेमा भले अडीच तीन तासात संपतो पण जर त्याचा शेवट सुखद झाला तरच आपण निश्चिंत मनाने घरी जातो. पण जर ‘दि एंड’ हा गोड शेवट नसून डोकल्याला नसता तापच देणारा असेल तर मात्र आपल्या मनात त्या ‘दुःखद शेवटाची’ सल कायम राहते. आपण मनाचे जुमले बांधायला लागतो. ‘आता तिचं कसं होणार..?’ ‘शेवट असा असता तर..??’ एक ना अनेक प्रश्न घेऊन आपण घरी जातो.. सैराटच्या बाबतीतही असेच झाले नाही का..?? आर्चि आणि परश्याचं ते गोंडस लेकरू एकटंच राहतं शेवटी. मन सुन्न करणारा शेवट देऊन नागराज जी मंजुळे ह्यांनी परीक्षांची चांगलीच गोची केली होती. अजूनही टीव्ही वर सैराट पाहताना शेवट आला की टीव्ही बंद करून टाकलेले बरे असे वाटणारे प्रेक्षक आहेत. हळवे असतात हो काही जण, नाही सहन होत असलं काही.. इतके दिवस महिने उलटूनही सैराट चा विषय निघाला की त्या बाळाचं वाईटच वाटतं.. माहीत आहे सगळं खोटं खोटं असतं पण म्हणतात ना जेव्हा ते सगळं खरं वाटतं तेव्हाच तर तो चित्रपट यशस्वी होतो..!! 

 

READ ALSO :  ज्यांच्या सिनेमाचा ट्रेलरच अंगावर काटे आणतोय तो सिनेमा कसा असेल..!!??

आता प्रेक्षकांची ही चिंता नागराजनी सिरियसली घेतलीये.. त्यांनाही त्या बाळाच्या आयुष्याचं पुढे काय होतं ते लिहायची इच्छा झाली. स्क्रिप्ट लिहून त्यांनी सैराट चा पुढचा भाग बनवण्याची आपली इच्छा सत्यात आणायलाही सुरुवात केली. ह्या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले सुद्धा. त्याच्या कथेबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. तरीही आपल्या तर्क लावायचा झाला तर आपल्या आईबाबांच्या खुनाचा ‘बदला’ घेणारी गोष्ट असू शकते किंवा प्रिन्स मामाला माफ करून त्याला आणि त्याच्या सारख्या लोकांना वठणीवर आणण्याची गोष्ट असू शकते आणि हे कोण करेल माहीत आहे..? अर्चि आणि परश्याचा मुलगा. होय.. तो अनाथ झाल्यावर हैदराबादची सुमन अक्का त्याला सांभाळेल.. आणि मोठा झाल्यावर त्याच्या मावशीकडे सोपवला जाईल. आता ह्या हिरोचा रोल कोण करेल हे अजून माहीत नाही पण मावशी ‘गुलाबजाम’ फेम सोनाली कुलकर्णी असेल ह्याची जोरदार चर्चा आहे.

खेडे गावातली बोली, लेहेजा सोनाली सारख्या मुरलेल्या कलाकाराला अवघड नाहीच आणि मंजुळे सरांचं हटके दिग्दर्शन असल्यावर सैराट चा दुसरा भाग सुद्धा शंभर करोड क्लब मध्ये जाईल असे वाटते. मुख्य म्हणजे त्याचा शेवट सुखद असणार ह्याची खात्री वाटते म्हणजे प्रेक्षकही खुश होणार..!! तसेही नागराज मंजुळे ह्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सैराट, फँड्री, नाळ असे समजुपदेशक आणि भन्नाट सिनेमे केल्यामुळे त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली आहे. आता त्यांच्या ह्या लोकप्रियतेला अजून वेगळया उंचीवर न्यायला सैराट भाग दोन लवकरच सज्ज होईल..!! 

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author