रीमाताईंच्या ‘होम स्वीट होम’ला सलमान खानच्या मराठीतून शुभेच्छा…

रीमाताईंच्या होम स्वीट होमला सलमान खानच्या मराठीतून शुभेच्छा…

बॉलीवूड मध्ये नव्वदच्या दशकात आईच्या भूमिकेला ग्लॅमर प्राप्त करून देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘होम स्वीट होम’ हा मराठी चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाला बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने मराठीतून शुभेच्छा देत रीमा यांच्या आठवणीना उजाळा दिला आहे.

रीमा यांच्याविषयी बोलताना सलमान खान म्हणाला, “माझे पदार्पण असलेला आणि सुपरहिट ठरलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे मला ओळख मिळाली. त्यात रीमा माझ्या आईच्या भूमिकेत होत्या. खासगी आयुष्यात मला २ आई असल्या तरी सिनेमात मात्र माझ्या आवडीच्या आई नेहमी रीमाच राहिल्या. अतिशय प्रेमळ, समंजस अशा रीमा ताईंची प्रमुख भुमिका असलेला होम स्वीट होम चित्रपट मी नक्कीच बघणार आहे.”

READ AlSO:‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल

सलमान खानने रीमा यांच्या बद्दल बोलताना ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटासह अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे,तसेच आपल्या सर्व चाहत्यांना ‘होम स्वीट होम’ चित्रपट आवर्जून बघण्याचे आवाहनही केले आहे.

हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोऍक्टिव्ह प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात रीमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी,विभावरी देशपांडे, प्रसाद ओक सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’मध्ये आहेत.

सलमान खान याने खास मराठीतून दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author