समीर धर्माधिकारी आता खलभूमिकेत

समीर धर्माधिकारी आता खलभूमिकेत

समीर धर्माधिकारी एक देखणं व्यक्तिमत्व. त्याच्या अभिनयाबरोबर, त्याच्या रूपावर फिदा असलेल्या तरुणींची संख्या काही कमी नाही. अभिनयात विविधांगी भूमिका त्याने साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील मोलाची कामगिरी केली आहे. ‘तू तिथे असावे’ या आगामी मराठी चित्रपटात समीरचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘बाबा भाई’ या ‘डॉन’ ची भूमिका समीर याने या चित्रपटात साकारली आहे. यात समीर धर्माधिकारीचा रावडी लूक आपल्याला पहायला मिळतोय. ‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. समीर याच्या सर्व भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटातील ही खलभूमिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कोणत्याही कलाकारची हीच अपेक्षा असते की रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेला दाद द्यावी. अभिनेत्याला अभिनयाच्या कोणत्याही एकाच पठडीतील अभिनय करण्यापेक्षा भिन्न भूमिका साकारणे नेहमीच आवडते. तसाच काहीसा विचार समीरचा ही भूमिका स्विकारताना केला असावा.

 

READ ALSO : विठ्ठल नामाचा गजर श्रेयसच्या मुखी

चित्रपटात समीरसोबत भूषण प्रधान, पल्लवी पाटील, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार आहेत.

या चित्रपटाचे कथानक अजून गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटाच्या शीर्षकावरून चित्रपट एखादी प्रेमकथा घेऊन येत आहे असा अंदाज बांधता येईल. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काय घेऊन येत आहे आणि या नवीन भूमिकेत समीर धर्माधिकारी कसा दिसेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

‘तू तिथे असावे’ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. मंदार चोळकर, डॉ.श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव या गीतकारांनी लिहिलेल्या गीतांना दिनेश अर्जुना यांचे संगीत लाभले आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत.

येत्या ७ डिसेंबरला ‘तू तिथे असावे’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. फिल्मीभोंगा मराठी कडून या नवीन भूमिकेसाठी समीर धर्माधिकारीला खूप खूप शुभेच्छा..

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author