पिंजऱ्यातील आनंदी येत आहे नवीन रुपात, तिच्या संभाव्य जोडीदारासोबत.

पिंजरा या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतील आनंदी आठवते का? त्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती ती सदैव हसमुख अन चुलबुली अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने. या मालिकेद्वारे तिने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केले. तिच्या अभिनय व नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्या मालिकेनंतर अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने खूपच कमी कालावधीत यशाचे शिखर सर केले. नाटक, चित्रपट, मालिका यातून तिने तिचे अभिनय कौशल्य दाखवले आहे. पण सध्या आपली लाडकी अभिनेत्री संस्कृती कुठे आहे? आणि करतेय तरी काय? असे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. मलाही पडले आहेत. पण या प्रश्नाची उत्तरे खुद्द संस्कृती बालगुडे हिनेच दिली आहेत.

संस्कृती आपल्या इन्स्टाग्राम अकांउंटवर खूप अॅक्टिव असते आणि गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज ह्या अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी जास्त असतात. अशावेळी अर्थातच तिच्या फॉलोअर्सना सध्या तिच्यात आणि सुमेधमध्ये नक्की काय सुरू आहे ह्याची खूप उत्सुकता आहे.

READ ALSO : “गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?” या गाण्यामागची कहाणी…

सिनेसृष्टीतल्या सुत्रांच्या अनुसार, संस्कृती आणि सुमेधची नुकत्याच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मैत्री झाली. दोघंही समवयस्क असल्याने मैत्री ही प्रोजेक्टपूरती न राहता, मग ती घट्ट मैत्रीत रूपांतरीत झाली. त्यामूळे फक्त संस्कृतीच नाही तर सुमेधच्याही इन्स्टापोस्ट आणि स्टोरीजमध्ये अधूममधून संस्कृतीचा उल्लेख असतो.

जर आपण काही मागील व आगामी चित्रपटांचा आढावा घेतला तर नक्की  कळेल की सुमेध आणि संस्कृतीने आत्तापर्यंत एकत्र सिनेमा केला नाही  आणि तरीही दोघे एकमेकांसोबत खूप छान दिसतात. सळसळत्या उत्साहातली ‘बबली गर्ल’ संस्कृती आणि तितकाच शांत चॉकलेट बॉय सुमेध एक क्युट कपल बनू शकतात आणि लवकरच हे दोघेही एका रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये एकत्र दिसणार आहेत.

संस्कृती बालगुडेच्या सोशल मीडिया नेटवर्किंग साइटवरून असं लक्षात येतं की त्या दोघांनी  नुकताच एक व्हिडीयो अल्बम शूट केलाय. त्यांच्या एकूणच सोशल नेटवर्किंग साइटवरच्या हालचालीवरून असे लक्षात येते की उत्तम लोकेशन्स असलेला हा म्युझिक अल्बम असे आणि तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सिनेसृष्टीतल्या ह्या नवीन जोडीची सिझलींग केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता आता नक्कीच दोघांच्याही चाहत्यांना लागली असणार यात काहीच शंका नाही.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि अभिनेता सुमेध या दोघांना त्यांच्या आगामी म्युझिक अल्बमसाठी फिल्मीभोंगा मराठीकडून खूप खूप शुभेच्छा… ?

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...