अभिनेता संतोष जुवेकर अडचणीत

अभिनेता संतोष जुवेकर अडचणीत

अभिनेता संतोष जुवेकर विरोधात  पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरातील अरण्येश्वर चौकात अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अभिनेता संतोष जुवेकर प्रमुख अतिथी म्हणून गेला होता.पंचवीस बाय वीस लांब रस्त्यात ही दहीहंडी उभारण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण रस्ता अडवला गेला. दहीहंडी दरम्यान रस्त्यात वाहतुकीची कोंडी झाली. तसेच उत्सव वेळी मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण देखील झाले . पोलिसांनी याची दखल घेत आयोजकांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितले परंतु पोलिसांना न जुमानता आयोजकांनी कार्यक्रम सुरु ठेवला त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोलिसांनी आयोजक आणि प्रमुख अतिथी अभिनेता संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संतोष जुवेकर म्हणतो तो दहीहंडीला पुण्याला गेलाच नव्हता आणि आयोजकांनी त्याला न विचारता त्याचे फोटो वापरले बॅनरसाठी. त्यामुळे जर तो तिथे नव्हताच तर त्याच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो. त्याच्या म्हणण्यानुसार तो दहीहंडीच्या दिवशी दिवसभर त्याच्या ठाण्याच्या घरीच होता.अजून एक महत्वाची गोष्ट संतोष जुवेकरला अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाने कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नव्हते असे असताना संतोष जुवेकर प्रमुख अतिथी म्हणून कसा जाणार ?

 

READ ALSO : छोट्या पडद्यावरील आजी शुभांगी जोशी ह्यांचे निधन

संतोष जुवेकर खरच दहीहंडीला गेला होता कि नव्हतं हे अजून एक कोड आहे . पण सध्यातरी संतोषच्या अडचणीत वाढ नक्की झाली आहे.

एकाच वेळी एखादा व्यक्ती दोन वेगवेगळ्या ठिकाणी कसा असू शकतो, याबद्दल तरी अजून काहीच माहिती उपलब्ध नाही. चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि असे उत्सव हे गणित पूर्वी पासून सुरु आहे. पण एखादा कार्यक्रम करताना त्या कार्यक्रमामुळे इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता आयोजक व कार्यक्रमास येणाऱ्या प्रमुख अतिथी यांनी घेणे गरजेचे आहे. तरीही पोलीस आणि आयोजक यांनी ही काळजी कार्यक्रमापूर्वी घेणे गरजेचे आहे.

अभिनेता संतोष जुवेकर सध्या तरी अडचणीत सापडला आहे हे मात्र नक्की. या अडचणींतूंन तो कसा मार्ग काढेल? हा अजून एक प्रश्न उपस्थित झाला आहे. संतोष आणि पुणे पोलीस काय असेल पुढे हे जाणून घेण्यसाठी वाचत राहा. फिल्मिभोंगा मराठी

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author