सर्व लाईन्स व्यस्त आहेत पण फोन च्या का हृदयाच्या..? कळेल लवकरच

सर्व लाईन्स व्यस्त आहेत पण फोन च्या का हृदयाच्या..? कळेल लवकरच

वेळच नाही हो मला, खूप बिझी आहे मी, कधी करणार व्यायाम?. म्हणजे बघा माणसं किती बिझी असतात. जो तो धावतोय, पळतोय, .पण कशासाठी? काही लोक धावतात करिअर साठी, तर काही धावतात पैशासाठी, तर काही प्रेमासाठी, कोणी कामासाठी, तर कोण कशासाठी. अशी सगळी धावाधाव चालू आहे. जो, तो व्यस्त आहे, सगळे फोन व्यस्त आहेत, त्यामुळे “सगळ्या लाइन्स सुद्धा व्यस्त आहेत.” प्रेमाच्या लाईन्स सुद्धा व्यस्त आहेत. म्हणजे?
म्हणजे प्रेमात सुद्धा हे व्यस्त आहेत. त्यामुळे हे सगळ्यात जास्त बिझी असतात. कोण कोण बिझी आहेत माहितीये का ह्या लाईनमध्ये? ‘समीर’ एक साधा सुधा सरळ मुलगा, ‘बाब्या’ हा समीरचा सख्खा मित्र. जरा फ्लर्ट का काय ते करणारा. चारपाच प्रेमिका, आणि त्याही एका पेक्षा एक” देखे ज्या खूपच व्यस्त आहेत मैत्री, प्रेम, लग्न….ह्या प्रोसेस मध्ये. सल्ला द्यायला आहेत ‘गडबडे बाबा’. सगळेच व्यस्त, त्यांच्या लाईन्स व्यस्त.

 

READ ALSO :  मराठी ताऱ्यांचे ‘कृष्णधवल’ फोटोशूट…!

एक मैत्री, प्रेम, लग्न, ह्या तरुणांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर धमाल करणारा अफलातून चित्रपट, “सर्व लाईन्स व्यस्त आहेत“. सरळ साधा माणूस प्रेमाच्या भानगडीत कसा पडेल?. पण जिवलग मित्र असतात की प्रेमाच्या टिप्स द्यायला, मग नाकासमोर बघून चालणारा सुद्धा जरा इकडे तिकडे बघायला लागतो. नजरा नजर झाली की मैत्री कशी करायची? ह्याच्या अनुभवी मित्राकडून मिळतात टिप्स. मग कितीही सरळ मुलगा प्रेमात पडू शकतो. मग जिवाभावाचा मित्र लग्न करायच्या टिप्स सुद्धा देतो. पण लग्न बंधनात अडकायचं का नाही हे आपलं आपल्यालाच ठरवायला लागतं. निस्तरायला मित्र नाही येत. आपलं आपल्यालाच निस्तरायचं असतं. मग काय करतो “समीर”? कुणाशी मैत्री होते आणि कुणाशी जमतं प्रेम? हे आपल्याला काळायलाच पाहिजे ना? मित्र बाब्या कसल्या कसल्या टिप्स देतो, होतात का खऱ्या? का होतं बुमरँग?

चारपाच प्रेमिका, एकापेक्षा एक, पण समीर ची लाईन कोणाबरोबर होते व्यस्त? आणि बाब्या नक्की काय करतो? कारण बाब्याने दिलेल्या टिप्स वापरताना मधेच गडबडे बाबांची एन्ट्री होते. ते काही गडबड करतात का गडबडीने मदतीला येतात ते सगळं चित्रपटात पाहायचं आहे. धम्माल मजा गडबडे बाबांची. कारण गडबडे बाबांची भूमिका केलेली आहे “महेश वामन मांजरेकरांनी” म्हणजे बघा. चुकवू नये असा असणार. समीर ची भूमिका केली आहे सौरभ गोखलेने, आणि बाब्या आहे सिद्धार्थ जाधव. सगळ्यांच्या (प्रेमाच्या) सर्व लाईन्स व्यस्त आहेत. कोणा बरोबर? संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, आणि राणी अग्रवाल, एवढ्या सगळ्या सौंदर्यावतींबरोबर व्यस्त असणार समीर. आणखी बरेच चेहेरे सुद्धा बघायचे आहेत. पण “गडबडे बाबांची” धमाल सगळ्या चित्रपटाचे ‘आकर्षण’ असणार आहे. एक भन्नाट चित्रपट. “सर्व लाईन्स व्यस्त आहेत”. मग काय करणार? थांबायचं आणि वाट बघायची.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author