सविता दामोदर परांजपे….. ती आली आहे…..!

सविता दामोदर परांजपे हे ८० च्या दशकातील गाजलेले नाटक, शेखर ताम्हाणे यांनी याचे लेखन केले असून यात मुख्य भूमिकेत दिवंगत अभिनेत्री रीमा लागू होत्या. त्यांचे अभिनय कौशल्य याबाबत आपण काही प्रतिक्रिया देण्या इतपत आपण काही मोठे नाही. कुसुम अभ्यंकर ही व्यक्तीरेखा त्यांनी अतिशय उत्तमरीत्या साकारली होती त्याला काहीच तोड नव्हती.

एका गाजलेल्या नाटकाचे चित्रपटात रुपांतर करणे हे काही सोपे काम  नाही. ती एक महत्वाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, लेखक यांनी उत्तमरीत्या निभावली आहे. शेखर ताम्हाणे यांची कथा, शिरीष लाटकर यांचे लेखन आणि संवाद.

शरद आणि कुसुम यांचा सुखी संसार असतो पण कुसुमला एका मृत्तात्म्याने  झपाटलेले असते याबाबत ती पूर्णपणे अनभिज्ञ असते. शरद एकदा त्याचा मित्राला त्यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी बोलावतो तेव्हा त्या मित्राला कुसुम हिच्यावर मृत्तात्म्याचा वावर आहे असे समजते. शरदला या भूत, मृतात्मे हे सर्व अंधश्रद्धा आहे असे वाटते. खार्यार्थाने तिथून शरद आणि कुसुम यांचा प्रवास सुरु होतो.

 

READ ALSO : TC GN REVIEW

सविता दामोदर परांजपे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले असून  जॉन अब्राहमने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जॉन अब्राहम याने प्रथमच मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांचा आधीचा ‘लाल इश्क़ ‘ या चित्रपट पण एकंदरीतच गूढ चित्रपटापैकी एक होता.

अभिनयाची कसदार कसब या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुबोध भावे याने शरदची व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारली आहे. कुसुमच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचे काम तृप्ती मधुकर तोरडमल हिने पूर्णपणे केले आहे. तृप्तीचा हा जरी मराठी पहिला चित्रपट असला तरी तिने अभिनयाची कसब दाखवली आहे. तिने तिच्या व्यक्तिरेखेसाठी खूप काम केल्याचे यातून दिसून येते. त्तीच्या दोन भूमिका आहे एक कुसुमची आणि दुसरी सविताची , जेव्हा सविताचा तिच्यावर संचार होता त्यावेळी होणारे तिच्यातील व तिचा आवाजातील बदल अगदी सहजरित्या तिने ती भूमिका साकारली आहे. राकेश बापट याने मित्राच्या आणि मानोस्प्चार्तज्ञ या दोन्ही व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारल्या आहे.

एकूणच चित्रपट सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत एक उत्सुकता निर्माण करतो. चित्रपटाच्या शेवटपर्यंत पुढे काय होईल याबाबत प्रेक्षक काहीच सांगू शकत नाही त्यांना तो चित्रपट स्वत: बरोबर पुढे नेतो.

चित्रपटातील संगीत, दृश्ये, गाणे खूप सुर्रेख आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची थोडीसुद्धा निराशा करत नाही.

जरूर एकदा तरी हा चित्रपट पाहावा.

फिल्मिभोंगा मराठी कडून या चित्रपटाला ४ स्टार्स ५ पैकी.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author