शशांक केतकरचा ‘३१ दिवस’ हा चित्तथरारक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

शशांक केतकरचा ‘३१ दिवस’ हा चित्तथरारक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

कालायः तस्मै नमः, स्वप्नांच्या पलीकडले, होणार सून मी या घरची या लोकप्रिय मालिकांमधून भूमिका साकारणारा शशांक केतकर, त्याचा नवीन चित्रपट घेऊन येत्या २० जुलैला प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘३१ दिवस’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आशिष भेलकर यांनी. चित्रपटाच्या नावावरून असं जाणवतं कि ह्या चित्रपटातील कथा वेळ मर्यादेशी जोडली गेलेली आहे. काहीतरी गोष्ट आहे जी ३१ दिवसात पूर्ण करायची आहे. अभिनेता शशांक केतकर या चित्रपटात ध्येयप्राप्तीसाठी  पछाडलेल्या तरुणाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. शशांक आता नेमक्या कोणत्या ध्येयाचा पाठलाग ३१ दिवसात करणार आहे, हे तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल, पण हे मात्र नक्की आहे कि ज्या कथानाकांमध्ये ‘कालमर्यादा’ हि संकल्पना येते, त्या कथांमधला थरार अनुभवायला प्रेक्षकांना खुप आवडतो.

नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रक्षेपण सोहळा पार पडला. त्यात चित्रपटातील तिन्ही गाणी दाखविण्यात आली. चित्रपटातील पहिलं गाणं आहे ‘मन का असे?’ ज्याला स्वरबद्ध केलंय हृषीकेश रानडे आणि कीर्ती किल्लेदार यांनी, दुसरं गाणं आहे “काय काय सांगू तुला गं बाय!” या गाण्याला आवाज दिलेला आहे गायिका वैशाली माडे हिने, तिसरं गाणं आहे ‘रंग वेगळा’ जे हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं आहे. या तिन्ही गाण्यांचे बोल लिहिलेले आहेत मंगेश कांगणे यांनी. तर संगीत दिग्दर्शन केलंय आघाडीचे संगीतकार चिनार-महेश यांच्या जोडीने. या सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी चित्रपटाविषयी आपापलं मत व्यक्त केलं. अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या मते हा चित्रपट हिंदीच्या तोडीस तोड असा बनविण्यात आलेला आहे, ज्यात तिच्या व्यक्तिरेखेला अतिशय सुंदर पद्धतीने पडद्यावर दाखविण्यात आलेले आहे. मयुरीला जेव्हा या चित्रपटात काम करण्याविषयी विचारण्यात आलं होतं त्यावेळी तिची ‘खुलता कळी हि खुलेना’ हि मालिका चालू होती त्यामुळे मयुरीला या चित्रपटात काम करणं अशक्य न्हवतं. पण जेव्हा मयुरीला कळालं कि ती मालिका बंद होणार आहे.. तेव्हा मयुरीने तात्काळ चित्रपटातील दिग्दर्शकांशी संपर्क केला आणि ‘खुलता कळी हि खुलेना’ हि मालिका बंद झाल्यानंतर पाचव्या दिवशी मयुरीने चित्रपटासाठी चित्रीकरण करायला सुरुवात केली होती. या चित्रपटाचे लेखक उमेश जंगम या चित्रपटाच्या कथानकाचा प्रवास सांगताना भावूक झाले होते. त्यांना पूर्ण विशास आहे कि इतक्या मेहनतीने बनविलेला हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल.

फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी.एस. बाबू निर्मित या चित्रपटामध्ये शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.