“विजय अखेर सत्याचाच होतो”, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘शिल्पा शिंदे’

“विजय अखेर सत्याचाच होतो”, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘शिल्पा शिंदे’

स्टार प्लस, दूरदर्शन, सब टीवी यांसारख्या वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या शिल्पा शिंदेला कुठे माहित होतं कि एक दिवस तिला तिच्या यशस्वी शो मधून बाहेर काढलं जाणार आहे. मार्च २०१५ मध्ये ZEEL (Zee Entertainment Enterprises Limited) या कंपनीने ‘&TV’ हि नवीन वाहिनी सुरु केली. ज्यावर ‘भाभीजी घर पर है !’ हा कार्यक्रम २ मार्च २०१५ पासून प्रदर्शित करण्यात आला. प्रथम ‘अनिता मिश्रा’ हि भूमिका शिल्पा शिंदे हिला देऊ करण्यात आली होती. पण काही कारणास्तव कार्यक्रमातील भूमिकांमध्ये बदल करण्यात आले आणि शिल्पा शिंदे हिला ‘अंगूरी भाभी’ हि भूमिका देण्यात आली, जी शिल्पाने आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर गाजवली.

 

READ MORE : गावरान हास्य कलाकारांना मिळणार संधी ‘हसुदेव’ होण्याची

एक वर्ष यशस्वीपणे ‘अंगूरी भाभीची’ भूमिका साकारल्यानंतर निर्माती बिनाफेर कोहली हिच्या सोबत मानधनावरून झालेल्या मतभेदामुळे शिल्पा शिंदेला ‘भाभीजी घर पर है !’ या मालिकेतून डच्चू देण्यात आला. तिच्या सेटवरील वर्तनुकीबद्दल अफवा पसरविण्यात आल्या. मालिकेतील इतर कलाकारांनी शिल्पाची बाजू घेतली नाही आणि काही दिवसानंतर तिच्याशी बोलायचं हि बंद केलं. कलाकारांची संस्था CINTAAने हि शिल्पाला, निर्मात्यांच्या झालं नसलेल्या पैशाच्या नुकसान भरपाईसाठी नोटीस पाठवली. ज्यात स्पष्ठ रूपाने लिहिलं गेलं होतं कि, “हि नुकसान भरपाई न देता शिल्पाला दुसरीकडे कुठे हि काम करता येणार नाही.” म्हणून शिल्पाला म.न.से ची मदत घ्यावी लागली. मनसेने शिल्पाची बाजू उचलून धरली. पण त्याने फारसा फरक पडला नाही आणि पुढील दीड वर्ष तिच्याकडे कोणत्या हि प्रकारचं काम आलं नाही.

निर्माते कोणालाही कोणत्याही क्षणी काढून टाकतात पण त्यांना कोणीही जाब विचारात नाही, पण आपल्या सारख्या कलाकाराला पूर्णपणे वाळीत टाकलं जातंय. यासाठी शिल्पा खूप झगडली. पण कोणीही तिचं ऐकलं नाही, तिला कोणीही मदत केली नाही. हा काळ शिल्पासाठी खूपच वाईट गेला. पण “कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.” या म्हणीप्रमाणेच झालं… काही दिवसांनी स्वतःला सिद्ध करण्याची संधी शिल्पाला चालून आली ‘बिग बॉस ११’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने. शिल्पाने ती संधी स्वीकारली आणि त्या संधीचं सोनं केलं. तिने ‘बिग बॉसमध्ये’ भारताच्या जनतेला हे दाखवून दिलं कि ती वाईट व्यक्ती नाही, उलट ती अतिशय प्रेमळ आणि निर्मळ मनाची व्यक्ती आहे. जे लोक शिल्पाला चुकीचं समजत होते त्यांचं मत परिवर्तन व्हायला लागलं. प्रेक्षकांच्या मनात शिल्पाविषयी आदर वाढत गेला आणि शेवटी शिल्पा शिंदे लोकांच्या मतांमुळे बिग बॉस ११ची विजेती ठरली.

फेब्रुवारी २०१८ मध्ये निर्मात्यांनी शिल्पाला तिची तक्रार मागे घेण्यासाठी विनंती केली आणि शिल्पाने हि मोठ्या मनाने निर्मात्याविरुद्धची तक्रार मागे घेतली. ‘बिग बॉस ११’ नंतर आता शिल्पाला कामाच्या चांगल्या चांगल्या ऑफर येत आहेत. शिल्पा शिंदेच्या आयुष्यातील ह्या घटनाक्रमावरून “विजय अखेर सत्याचाच होतो.” ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.