कोण आहे हा तरुण योद्धा? जो शेतकऱ्यांच्या बाजूनं लढायला तयार…. ‘शिवा’ चा ट्रेलर पहिला का?

कोण आहे हा तरुण योद्धा? जो शेतकऱ्यांच्या बाजूनं लढायला तयार…. ‘शिवा’ चा ट्रेलर पहिला का?

‘शेतकरी’ म्हणजे जगाचा पोशिंदा, त्यानं पिकवलं तर सारं जग खाऊ शकतं. पण जर शेती नाही केली तर सारं जग खाणार काय? सगळं धान्य, भाजीपाला, फळं, हे सगळं त्याच्या कष्टाने आपल्याला मिळतं. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा ठरतो. आपल्या देशात शेती पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाला तर पिकं चांगली येतात. आणि भरघोस उत्पन्न मिळतं, पण नाही पडला चांगला पाऊस तर? ‘नुकसान’. हा मोठा प्रश्न उभा राहतो शेतकऱ्यांसमोर. वाया जातात सगळे त्याचे कष्ट. आणि उभं राहतं मोठं प्रश्न चिन्ह. शेतीवर घेतलेलं मोठं कर्ज फेडायचं कसं? आणि वेळ येते आत्महत्त्या करायची. मग ह्या शेतकऱ्याचा कोण वाली? त्यानं असंच जगायचं का? त्याला मदत कोण करणार? आपण तर फक्त त्यानं पिकवलेलं खाणार. मग अडचणीत त्याला मदत कोण करणार? एक तरुण आपलं करिअर करायच्या तयारीत असताना, ऐन तारुण्यात एखादं प्रेम मिळवायच्या वयात, त्याला समोर दिसतात हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न, गावातली गुंडगिरी, सावकारी, जमिनी हडपायच्या, असले पण मोठे प्रश्न शेतकऱ्याच्या समोर असतात त्या प्रश्नांना कोण सोडवणार? दादागिरिचा कोण कैवारी? हा तरुण शिवरायांच्या प्रेरणेने उभा राहतो शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आणि काय घेतो निर्णय आपल्या आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर? प्रेम करतो, का होतो शेतकऱ्यांचा कैवारी…

इतक्या तरुण वयात घरातली वडीलधारी मंडळी तरुणांना म्हणतात तुला अजून नाही कळायचं ह्यातलं काही? तू अजून लहान आहेस? तुला अनुभव नाही ह्यातला, तुला आत्ता नाही जमणार? पण प्रत्येकाला देवानं दिलीये वेगळी, बुद्धी, वेगळी शारीरिक क्षमता, वेगवेगळी निर्णय घ्यायची ताकत. त्यातून घडतात काही जबरदस्त व्यक्तिमत्व. असाच एक युवा उभा राहतोय शेतकऱ्यांच्या पाठीमागे, त्याला मिळाली एक प्रेरणा एका चांगल्या माणसाकडून, आणि त्यानं झोकून दिलंय स्वतःलाच ह्या जगाच्या पोशिंद्याच्या मदती साठी. शेतकऱ्यांसाठी झालाय जणू ‘सिंघम’. पेटून उठतो सर्व शक्तीनिशी. घेतो तुकोबांचा उपदेश आणि शिवरायांचा आदेश आणि मुकाबला करतो सगळ्या शत्रूंचा. कोण आहे हा तरुण योद्धा? त्याचं नाव आहे ‘ शिवा’.

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

‘शिवा’ – एक युवा योद्धा’ ह्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. ‘सिद्धांत मोरे’ हा आहे ह्या नव्या चित्रपटाचा नायक. तरुण तडफदार ‘शिवा’ ची भूमिका ‘सिद्धांत’ साकारतो आहे ह्या चित्रपटात. वेगळ्या विषयावर आधारलेल्या ह्या चित्रपटाची कथा लिहिली आहे- संजय मोरे यांनी आणि दिग्दर्शन केलं आहे विजय शिंदे यांनी. सुंदर सुंदर गाणी सुद्धा आहेत ह्या चित्रपटात. विशेष भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे एक मराठी चित्रपटातला कसलेला अभिनेता ‘मिलिंद गुणाजी’. या शिवाय दिसणार आहे एक नायिका, जी ह्या शिवाच्या प्रेमात पडते. आणि अनेक उत्तम उत्तम कलाकार करणार आहेत शिवाची सोबत, कोण आहेत हे उत्तम कलाकार? १५ फेब्रुवारीला दिसतील रुपेरी पडद्यावर. कारण हा वेगळा चित्रपट प्रदर्शित होणार आहे १५ फेब्रुवारीला. तारीख लक्षातच ठेवा. यतोय शेतकऱ्यांचा कैवारी ‘शिवा’ – एक युवा योद्धा.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author