धक्कादायक घटस्फोट : मराठी मनोरंजन विश्वातील कीर्ती प्राप्त लोकांचे

धक्कादायक घटस्फोट : मराठी मनोरंजन विश्वातील कीर्ती प्राप्त लोकांचे

“लग्नाच्या ‘गाठी’ स्वर्गात बांधल्या जातात” अशी आपल्याकडे एक समजूत आहे. पण त्या ‘गाठी’ पृथ्वीवर सोडविल्या जाण्याचं प्रमाण हि आजकाल वाढल्याचं दिसतंय. मनोरंजन विश्व हि त्याला अपवाद नाही. या ब्लॉगमध्ये आपण अशाच काही कलाकारांच्या घटस्फोट आणि पुनर्विवाहाचा एक आढावा घेणार आहोत.

महेश मांजरेकर 

 

 

सुप्रसिद्ध दिग्दर्शक,लेखक, निर्माते, अभिनेते महेश वामन मांजरेकर यांचं पहिलं लग्न दिपा यांच्याशी झालं होतं. पण काही कारणास्तव त्यांनी दीपा मांजरेकर यांच्याशी घटस्फोट घेतला व  त्यानंतर त्यांनी अभिनेत्री मेधा यांच्यासोबत दुसरे लग्न केले. मेधा मांजरेकर यांनी बहुतांश काम महेश मांजरेकर निर्मित/दिग्दर्शित चित्रपटातच केलेले आहे.

स्वप्नील जोशी

 

 

मराठीतला ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख असलेल्या स्वप्निल जोशीने देखील पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले आहे. स्वप्निल ने २००५ मध्ये एका दंतवैद्य (डेंटिस्ट) अपर्णा जोशी यांच्याशी प्रेम विवाह केला होता. पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. १६ डिसेंबर २०११ मध्ये औरंगाबादमधील ताज हॉटेल मध्ये लीना आराध्ये बरोबर स्वप्नीलने दुसरे लग्न केले. लीना ह्यासुद्धा व्यवसायाने दंतवैद्य आहेत.

राहुल महाजन

 

 

प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन याचे आतापर्यंत दोन घटस्फोट झालेले आहेत. राहुलने त्याची लहानपणीची मैत्रीण श्वेता सिंग हिच्याबरोबर विवाह केला होता. काही कारणांमुळे श्वेताने राहुलशी घटस्फोट घेतला. त्यानंतर  राहुलनी दुसरा विवाह ‘स्वयंवर’ या शोमधल्या डिंपी गांगुली हिच्याशी केला. पण हे लग्नही फार काळ टिकू शकले नाही व याही लग्नाचे नंतर घटस्फोटात रूपांतर झाले.

सई ताम्हणकर 

 

 

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते. अमेय हा देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक प्रोड्युसर असून त्याची ‘लोडिंग पिक्चर्स’ नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. सई आणि तिच्या पतीमध्ये सगळे काही सुरळीत सुरू आहे असाच तिच्या फॅन्सचा समज होता. पण एका इंटरव्यू दरम्यान सईनेच आपला घटस्फोट दीड वर्षांपूर्वीच झाला आहे असे जाहीर केले. दोघांच्या या घटस्फोटाची सिनेमा जगतात बरीच चर्चा रंगली होती.

शशांक केतकर 

 

 

‘होणार सून मी या घरची ‘ या मालिकेद्वारे घराघरात ‘श्री’ म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता शंशांक केतकरने देखील पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत झाले होते. दोघांची जोडी खूपच प्रसिध्द झाली होती. पण त्यानंतर एका वर्षातच शशांक आणि तेजश्री प्रधानने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. गेल्याच वर्षी शशांकने, प्रियंका ढवळेसोबत दुसरे लग्न केले. प्रियंका हि कथ्थक डान्सर असून ती पेशाने वकिल आहेत. हा घटस्फोट सर्वांसाठीच धक्कादायक होता.

अमोल पालेकर 

 

सिने जगतातले प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी देखील दुसरे लग्न केले आहे. अमोल पालेकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव चित्रा असे होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अमोल पालेकर यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले व पुन्हा आपला संसार नव्याने थाटला.

मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडीं आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author