विठ्ठल नामाचा गजर श्रेयसच्या मुखी

विठ्ठल नामाचा गजर श्रेयसच्या मुखी

विठ्ठल नामाचा रे टाहो, विठ्ठल आवड़ी प्रेमभाव. विठ्ठलाचे नाम अनेक, विठ्ठलाची थोरवी गावी तेवढी कमी, विठ्ठलाची स्तुति करावी तेवढी कमी. विठ्ठलाचे भक्त अनेक, विठ्ठल हे संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.  ‘विठ्ठल’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. आपल्या सर्वांचा लाडका श्रेयस तळपदे ज्याने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील आपली ओळख निर्माण केली आहे याने बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपटात पुन्हा पदार्पण करत आहे. श्रेयस तळपदे हा २५ फूट भव्य अशा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर वंदन करताना दिसत आहे. २५० डान्सर सोबत ढोल ताशा पथक, अबीराची उधळण, भगव्या पताका, गाण्याच्या शेवटी सचित पाटीलच्या रूपात होणारे विठ्ठल दर्शन आणि विशाल दादलानीचा दमदार आवाज या सर्वातूनच या गाण्याची भव्यता बघायला मिळत आहे. सदर गाणे गुरु ठाकूर यांनी लिहिले असून राजू सरदार यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

 

READ ALSO : नाळ : नात्याची एक सुरेल गुंफण

राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन, सोबतच टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचित पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे.

‘विठ्ठल’ नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाच्या निर्मीतीची धुरा दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राजपुरोहित यांनी सांभाळली असून, जगदीश जाखड, प्रल्हादसिंह राजपुरोहित आणि अरुण त्यागी हे सहनिर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ‘विठ्ठल’ या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे. हा चित्रपट ७ डिसेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

श्रेयसचे मराठी चित्रपटसृष्टीत पुनः पदार्पण त्याच्या फॅन्ससाठी एक सुंदर मेजवानी आहे. श्रेयस तुला फिल्मीभोंगा मराठीकडून खूप खूप शुभेच्छा.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author