आता मराठी सिनेमात सुद्धा झळकणार ‘श्रिया पिळगावकर’.

आता मराठी सिनेमात सुद्धा झळकणार ‘श्रिया पिळगावकर.

‘श्रिया’ म्हणजे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर ह्यांची कन्या. लहानपणापासूनच सचिन आणि सुप्रिया ह्या दोघांच्या अभिनयाच्या छायेत वाढलेली ‘श्रिया’, आज स्वतःच्या हिमतीवर अभिनय संपन्नते कडे वाटचाल करते आहे. छोटी असतानाच तिच्यातल्या अभिनयाची झलक तिने सचिन पिळगावकारांच्या तू तू – मै मै ह्या टी व्ही सिरीयल मध्ये दाखवली. आणि तेंव्हापासून सुरू केले अभिनयाचे धडे गिरवायला. आधी तिने आपलं शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण केले आणि कंबर कसली आई आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी. मार्गदर्शन तर आई आणि वडिलांनीच केलं पण वेगळं काही करण्यासाठी तिने काही इंग्लिश भाषेतले स्टेज प्ले केले. त्यात तिच्या कामगिरीचं कौतुक झालं. कारण जे काही करायचं ते अगदी मनापासून करायचं, हे तिने ठरवलं होतं. नंतर तिने गाठली ‘हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी’. तिथे तिने शॉर्ट फिल्म तयार करायचा अभ्यास केला आणि स्वतः दिग्दर्शित आणि स्वतःच्या निर्मितीच्या दोन शॉर्ट फिल्म्स तयार केल्या पहिली होती ‘पेंटेड सिग्नल’ आणि दुसरी ‘ड्रेसवाला’. ह्या शॉर्ट फिल्म चं मोठं कौतुक झालं. नंतर तिने एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली ‘ पंचगव्य ‘ नावाची. तिचा आत्मविश्वास वाढला.

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

शाहिद कपूर बरोबर तिने जाहिरात क्षेत्रात सुद्धा चांगली कामगिरी करून स्वतःचे नाव मोठं करून घेतलं. टी व्ही माध्यम तिला नवीन नव्हतं म्हणून तिने पुन्हा ‘ Stupid Cupid’ आणि मिर्झापूर ह्या सिरियल्स केल्या. ‘१३ मसुरी’ सुद्धा तिने गाजवली. ‘एकुलती एक’ ह्या मराठी फिल्म नंतर तिने मराठी फिल्म केली नाही पण २०१५ साली श्रिया ने ‘Un Plus Une ‘ ह्या फ्रेंच फिल्म मध्ये काम केलं, आणि ह्या फ्रेंच फिल्मचं प्रदर्शन टोरंटोच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आलं ही श्रिया च्या चित्रपटातल्या कामाची जमेची बाजू ठरली.

२०१६ मध्ये आदित्य चोप्रा ह्यांच्या ‘फॅन’ ह्या चित्रपटासाठी श्रियाला ७५० मुलींमधून निवडण्यात आलं, आणि शारुख खान बरोबर काम करण्याची संधी तिनं स्वतःकडे खेचून आणली. आत्ता श्रिया पिळगावकर एका दक्षिणी चित्रपटात काम करते आहे. ह्या चित्रपटाचे नाव ‘हाथी मेरे साथी’, राणा दगगुबाती सोबत श्रिया पहिलाच साऊथ चा चित्रपट करणार आहे.सध्या ती ह्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण अनेक मराठीच्या पिळगावकर चाहत्यांकडून विचारलं जातंय की श्रिया ‘एकुलती एक’ ह्या चित्रपटा नंतर बरीच वर्षे झाली तरी मराठी चित्रपटात काम का करत नाही? तर नुकताच तिच्याशी झालेल्या मुलाखती मध्ये तिने जाहीर केलंय की मी आता लवकरच मराठी चित्रपटात पुन्हा काम करणार आहे. त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर मोठं नाव केलेल्या ह्या नवीन अभिनेत्रीला पुन्हा एकदा मराठी सिने रसिकांना नव्या ढंगात पहायची संधी लाभणार आहे हे आता नक्की आहे.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author