जेष्ठ अभिनेत्री शुभा खोटे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

(नवी मुंबई ) अशोकपुष्प संस्थे च्या वतीने सलग चार वर्षे महिला दिना दिवशी विविध क्षेत्रातील नऊ महिलांचा स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच चित्रपट सृष्टीतील जेष्ठ कलावंताचा गौरव करण्यात येतो. या वर्षी जीवन गौरव पुरस्कार साठ दशकांच्या वर आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्या अभिनेत्री शुभा खोटे यांचा सन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला. हा पुरस्कार जेष्ठ अभिनेता अंजन श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजक अनघा लाड, उमेश चौधरी, बालकलाकार हितार्थ पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

READ ALSO : ‘एक होतं पाणी’ ची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीस

याच प्रकारे विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्वाने आपले योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान याचवेळी वाशी च्या विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आला. पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये मोहिनी शबाडे (सह निर्माती व संस्थापिका ग्रेसफुल लिविंग फौंडेशन), नगरसेविका अंजली वाळुंज (राजकिय), मधुरा सुरपुर सराफ (झी २४ तास – पत्रकारिता), प्रियांका पांचाल (मिस लावण्यवती २०१८ आणि क्वीन ऑफ नवी मुंबई २०१८), शिवानी साहिनी (नायिका), सुहासिनी पडाळे (शास्त्रीय नृत्य शिक्षिका), समाजसेविका ज्योती पाटील आणि समाजसेविका स्मिता केणी यांना स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

श्री करियर अकॅडेमी चे अशोक बाबर, पेशवाई सिल्क सारीज चे दीपक घनावत, नगरसेवक संजू वाडे , देवेंद्र खडसे, संकेत बांदेकर , अर्चना तेंडुलकर , सुनीता घायतडक , अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author