लग्न म्हणजे बंधन वाटणाय्रा सर्व तरुण तरुणींसाठी ही मेजवानी

लग्न म्हणजे बंधन वाटणाय्रा सर्व तरुण तरुणींसाठी ही मेजवानी

बायको म्हटलं कि भल्या भल्याना घाम फुटतो तर मग ह्या बाबतीत सुबोध भावे कसा मागे राहील ? तो हि घाबरतो कि त्याच्या बायकोला , हो तर त्याची ही हवा गुल होते बायकोच्या नावाने. म्हणून तर तो बायको व लग्न या नावाने दूर पळतोय. लग्नात मंगलाष्टक कशासाठी असतात, शुभ लग्न सावधान भटजींनी म्हटल की लग्नापासून सावध राहा असाच याचा अर्थ होतो की काय असे बरेच जणांना वाटते म्हणून कदाचित आजकालची पिढी ही लग्न पासून फार दूर पळू पाहतेय, आणि हाच विषय अत्यंत योग्यरीत्या मांडण्याचं प्रयत्न हा “शुभ लग्न सावधान “ या चित्रपटकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे.

तर गोष्ट अशी सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा आगामी चित्रपट ‘शुभ लग्न सावधानयेत असून यात दोघे पहिल्यांदा एकत्र काम करत आहे . या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात सुबोधने अगदी सहजपणे तो बायकोला घाबरतो असे म्हटले आहे . हे सर्व अगदी विनोद रुपी मांडण्यात आलेआहे .

सुबोध भावे हा अष्टपैलू कलाकार म्हणण्यास काही हरकत नाही. सुबोधच्या मागील काही भूमिकांचा आढावा घेतल्यास आपल्याला समजेल की अभिनेता ते दिग्दर्शक अशा विविध भूमिका त्याने अगदी योग्यरीत्या पार पाडल्या आहेत. सध्या त्याची एक नवीन मराठी मालिका झी मराठीवर नुकतीच सुरु झाली आहे. त्यात तो एका वेगळ्या भूमिकेत आहे.

राम आगाशे (कल्पनाकांत) यांच्या ‘मी बायकोला घाबरतो’ या धम्माल काव्यपंक्तीवर,  आधारित या चित्रपटात नायक हा लग्नापासून पळत आहे,  पण का ?

या चित्रपटाची निर्मिती ही पल्लवी विनय जोशी यांनी केली असून समीर रमेश सुर्वे यानी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार कारण यात श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबियेदेखील  आहे. यांच्याबरोबर  प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या फ्रेश जोडीची अदाकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिलनार आहे. या चित्रपटाचा टीझर नुक्ताच प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. येत्या १२ ऑक्टोबर २०१८ रोजी शुभ मुहर्तावर आपल्या सर्वांना “ शुभ लग्न सावधान “ , आमंत्रित केले आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author