एक नवीन चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत: शुभवी लोकेश गुप्ते

एक नवीन चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत: शुभवी लोकेश गुप्ते

एक सांगायचं… अनसेड हार्मनी, जग प्रगत होत आहे, जेव्हा आपण प्रगत होत असतो तेव्हा आपल्या भोवतालचा परिसरसुद्धा प्रगत होत असतो. प्रगती म्हणजे आपल्या जीवनशैलीत होणारे बदल, पण हे बदल होत असतांना काही गोष्टी घडत असतात त्या नकळतपणे आपल्या दृष्टीआड जातात. पण अचानक जेव्हा त्या समोर येतात तेव्हा आपल्याला नकोशा होतात. असेच काहीसे नात्यांमध्ये असते. नातं टिकण्याचा पाया म्हणजे सुसंवाद. बदलत्या जगाबरोबर धावण्याच्या धुंदीत नात्यातील संवाद हरवला आहे. एकदा का संवाद हरवला तर व्यक्तींना गृहीत धरणे सुरु होते. गृहीत धरण्याच्या या मानसिकतेमुळे  नात्यात एक दरी निर्माण होते. अशी दरी जी कधीही न भरणारी असते. पालक आणि मुलं ह्यांच्यामधल्या न बोलल्या गेलेल्या सुसंवादाबद्दल… बदलत चाललेली जीवनशैली, पालकांचं व्यग्र शेड्युल्, मुलांकडून असलेल्या अपेक्षा, दिवसागणिक बदलत जाणारं जग, जीवघेणी स्पर्धा, मुलांची आणि पालकांची बदलत जाणारी मानसिकता, त्याचे पालक आणि मुलं या दोघांवरही होणारे बरे-वाईट परिणाम या पार्श्वभूमीवर हा चित्रपट भाष्य करतो.

 

READ ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

या चित्रपटाद्वारे शुभवी लोकेश गुप्ते मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अभिनयाची पार्श्वभूमी नसली तरी अभिनयाचे बाळकडू मात्र तिला लहानपणापासूनच मिळत होते. शुभवी ही अभिनेता लोकेश गुप्ते याची मुलगी आहे. लोकेश एक उत्कृष्ठ अभिनेता, लेखक आहे पण तो या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. शुभवी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तिच्याच वयाच्या मुलीची ही गोष्ट आहे. ह्या चित्रपटासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. एका वृत्तानुसार या चित्रपटानंतर अभिनय क्षेत्रात पुढे अभिनेत्री म्हणून काम करणार असे काही अजून तिने ठरवले नाही, केवळ आवड म्हणून ती हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाचा तिचा अनुभव खूप छान होता.

एक सांगायचं… अनसेड हार्मनी, या चित्रपटाची निर्मिती देवी सातेरी प्रॉडक्शननं केली आहे. चित्रपटात केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी आदींच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचं गीतलेखन जितेंद्र जोशी, संगीतदिग्दर्शन शैलेंद्र बर्वेनं केलं आहे. ऑस्कर विजेत्या रसूल पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे, तर पुष्पांक गावडेनं सिनेमॅटोग्राफी केली आहे. लोकेश गुप्तेने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author