सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

मराठी चित्रपट सृष्टीचा चॉकोलेट बॉय, नव्हे नव्हे गुलाबजाम बॉय सिद्धार्थ चांदेकरने आपल्या हजारो ‘स्त्री’ चाहत्यांच्या हृदयाला खिंडार पाडत आपल्या ‘लेडी लव’ मिताली मयेकर सोबत नुकताच साखरपुडा केला. त्यां दोघांनी इन्स्टाग्राम वर शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पहिल्या भेटी आणि नंतर त्याचे झालेले प्रेमात रूपांतरण हा कित्येक दिवस चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला.

 

READ ALSO :  सर्व लाईन्स व्यस्त आहेत पण फोन च्या का हृदयाच्या..? कळेल लवकरच

खूप महिने सिद्धार्थ आणि मिताली दोघांनीही आपले नाते मात्र काही काबुल केले नव्हते. रसिका सुनील म्हणजेच पूर्वीची शनाया आणि सिद्धार्थ चे जुने फोटो आणि नंतर सिद्धार्थ आणि मितालीचे एकत्र फोटो हे चाहत्यांना भ्रमित करत होते. नक्की प्रेमप्रकरण कोणामध्ये आहे हे कळायला मार्ग नव्हता. पण रसिका सुनील अचानक परदेशात पुढच्या शिक्षणासाठी गेली आणि सिड-मिट च्या प्रेमप्रकारणाचा चाहत्यांना सुगावा लागलाच. त्यानंतर मितालीच्या वाढदिवसाला सिद्धार्थ ने केलेल्या ‘फेअरी टेल प्रपोझ’ नंतर म्हणजे अगदी परी कथेतील राजकुमाराप्रमाणे मितालीला लग्नाची मागणी नंतर त्या दोघांनी आपले नाते जगासमोर उघड केले.

नुकताच त्या दोघांचा ऑफिशियल साखरपुडा झाला. ह्या कार्यक्रमाला घरच्या नातेवाईकांची आणि मराठी सिने सृष्टीतील त्यांची मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होती. सगळ्या नाटक, सीरिअल मधील सह कलाकार मंडळींनी जोरदार सेल्फी शूट केले आणि धडाधड फोटो इन्स्टाग्राम वर आले. हे फोटो पाहून भरपूर तरुणींनी सिड-मिट ह्या जोडीला ना पसंती दर्शवली. आणि काही चाहत्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा ही दिल्या. मात्र हिरव्या रंगाचे मॅचिंग कपडे, दोघांचे प्रसन्न आणि हसतमुख चेहरे त्यांच्या आनंदाची पावती देत आहेत. सिड च्या मिठीतला मितालीचा फोटो तर त्यांच्या प्रेमाची साक्ष देत आहे असेच वाटते जणू. आता हे प्रेमी युगुल लवकरच लग्नाच्याही बंधनात अडकतील अशी चाहत्यांची इच्छा आहे. फिल्मीभोंगा मराठी तर्फे ही सिड-मिट ला साखरपुड्याच्या आणि भावी वाटचालीला खूप शुभेच्छा..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author