बकुळेचा धनी शतायुषी होवो

बकुळेचा धनी शतायुषी होवो

तर गोष्ट अशी की आपला लाडका सिद्धार्थ जाधव याचा कालच वाढदिवस झाला. सिद्धार्थवर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचा अक्षरशः पाउस पडला. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसात विशेष आठवणीत राहणारा पाउस म्हणजे गारांचा पाउस तसेच काहीसे सिद्धार्थच्या शुभेच्छाबाबत आहे. सोनाली कुलकर्णीने सिद्धार्थला अगदी अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या “नाम्या…लेका…वाढदिवसाच्या शुभेच्छा बरंका” याच्यावरून तुम्हाला काही आठवले का? तर गोष्ट आहे की सोनाली कुलकर्णीने अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव यानेही अभिनेता म्हणून प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट बराच गाजला होता. त्यातील बकुळाचा नवरा नामदेव म्हणजेच आपला सिद्धू होता व त्यामुळेच अशा अनोख्या पद्धतीने सोनालीने सिद्धूला म्हणजेच तिच्या पहिल्यावहिल्या ऑनस्क्रीन नायकाला या शुभेच्छा दिल्यात. अश्या प्रकारच्या ऑनक्रिन नायकाला किंवा नायिकेला शुभेच्छा देण्याचा ट्रेंड आलाच तर आश्चर्य वाटायला नको.

 

READ ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

सिद्धार्थने मग तिचे आभारही अगदी त्याच पद्धतीने मानले. “Thnx बकुळे…. @meSonalee … पन मला एक कळत न्हाय … birthday नक्की हाय कुनाचा”

त्यावर सोनाली म्हणते “धनी…. अावं काय करायचं तुमचं”. सिद्धार्थ जाधव हा त्याच्या विनोदी, व मनमिळावू स्वभावामुळे मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. इतक्या वर्षानंतरही आपल्या त्या व्यक्तिरेखेत जाऊन एकमेकांना शुभेच्छा देण्याचा अंदाज असेही सांगतो की सिद्धार्थ एक अभिनेता म्हणून जितका चांगला आहे तितकाच तो एक माणूस म्हणूनही ग्रेट आहे. सिद्धार्थला आलेल्या शुभेच्छांना त्याला जमेल त्यापद्धतीने वेळात वेळ काढून बऱ्याच व्यक्तींचे स्वतः आभार मानले. त्याच्या ह्या कृतज्ञतेला सचिन म्हात्रे यांनी खूप छान ट्वीट केलं आहे “सिध्दार्थ, काल तुझा वाढदिवस होता. असंख्य शुभेच्छा व्टिटरवर पावसासारख्या धो धो कोसळल्या. कौतुक एकाच गोष्टीचं वाटतं की, त्यातल्या काही तुरळक अपवाद वगळता 95% शुभेच्छांना तु काॅमेंन्ट/लाईक केलंस. यावरूनच तुझे पाय अजुन जमिनीवरच आहेत हे दिसुन आलं. GREAT…”

बकुळा नामदेव घोटाळे हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सद्धार्थ जाधव हे दोघे प्रमुख भूमिकेत होते. त्यातील अजून एक महत्वाची बाब म्हणजे भरत जाधव यांनी प्रथमच खलनायकाची भूमिका साकारली होती. ख्यातनाम लेखक मच्छिन्द्र मोरे यांच्या लेखणीतून साकार झालेला आणि केदार शिंदेने दिग्दर्शित केलेला हा ट्रेंडसेटर चित्रपट म्हणजेच बकुळा नामदेव घोटाळे आज सोनालीच्या माध्यमातून आठवणी झाली. काही चित्रपट असे असतात ते त्यांच्या पात्रांमुळे सदैव आठवणीत राहतात. सोनालीने सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author