दिन दिन दिवाळी: आली सिद्धार्थच्या घरी

दिन दिन दिवाळी: आली सिद्धार्थच्या घरी

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी.. हे गाणे आपण आपल्या लहानपणापासून गात आहोत. दिवाळी म्हटलं की आकाशकंदील, रांगोळी, फटाके, पणत्या, चविष्ट चटकदार फराळ, विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवाणी. नवीन कपडे,, वस्तू, दागिणे, खूप सारी खरेदी आणि ही खरेदी करण्यासाठी रस्त्यावर लोकांची गर्दी ह्या गर्दीत श्‍वास घेणेही मुश्किल होते. सिनेअभिनेता किंवा अभिनेत्री म्हटलं तर त्यांना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वेगळी पण ह्या बाबतीत सरस ठरला तो आपला लाडका सिद्धार्थ जाधव, सर्वांना माहितच आहे की सध्या सिद्धार्थ जाधव हा रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा या हिंदी चित्रपटात एक महत्वाची भूमिका साकारतो आहे. ह्या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादला रामोजीत सुरू असल्यामुळे  सिद्धार्थचा मुक्काम तिकडेच आहे. अशातच दिवाळीत त्याला दोन दिवसांची सुट्टी मिळाली आणि सिद्धार्थने युक्ती लढवुन मुंबईच्या रस्तावर त्याच्या कुटुंबासोबत दिवाळीची खरेदी केली.

 

READ ALSO : कल्याणी लवकरच घेऊन येत आहे मीनाक्षीची कथा…

सिद्धार्थची ही युक्ती सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. खऱ्या आयुष्यात सिद्धार्थ एक अवलिया असून तो नेहमी काहीतरी शक्कल लढवत असतो. तोंडाला रुमाल बांधून त्याने सगळी खरेदी केली. तो सर्वसामान्य लोकात सहजपणे वावरत होता तरीही त्याचे चाहते त्याला ओळखू शकले नाहीत. आहे की नाही गम्मत.! सर्वांना माहित आहे सिद्धार्थ हा यशाच्या शिखरावर आहे आणि असे असतानाही त्याचे पाय अजुनही जमिनीवर आहेत. यशाची हवा त्याच्या डोक्यात गेली नाही हे खरच खूप कौतुकास्पद आहे. त्याच्या अश्या साध्या स्वभावामुळे त्याला त्याचे आयुष्य हे सामान्य माणसासारखे जगायला आवडते. दिवाळीची सर्व खरेदी त्याला स्वतःला करायला खूप आवडते. म्हणुन त्याने बाईक स्वारी करत त्याच्या कुटुंबासोबत दिवाळीची खास खरेदी केली.

सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबाचा बाइकवरील फोटो सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. दिवाळी म्हंटल की मुंबईत गर्दीला उधाण येत आणि जर दिवाळीच्या आधी रविवार असेल तर विचारायला नकोच. अशातच गाडी चालवणे खूप कठीण म्हणुनच सिद्धार्थने बाईक हा पर्याय निवडून दिवाळीची खरेदी पूर्ण केली. सिद्धार्थ तू आयुष्यात खूप खूप प्रगती कर. यशाची अगदी उंच उंच शिखरं सर कर मात्र तुझे पाय असेच सतत जमिनीवर असे राहू दे. तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

फिल्मीभोंगा मराठीकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा… ?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author