आला रे आला सिंघमचा बछडा सिम्बा आला..!! प्रेडिक्टेबल तरी मजेदार..

आला रे आला सिंघमचा बछडा सिम्बा आला..!! प्रेडिक्टेबल तरी मजेदार..

 

ट्रेलर मध्येच आख्खा सिनेमा सांगून टाकला असला तरी पब्लिकला सिनेमा पूर्ण संपेपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याच्या रोहित शेट्टीच्या ‘कले’ ला पहिला सलाम. पोस्टर, टिझर आणि नंतर ट्रेलर पाहिलं की लोकं ठरवतात ते एखाद्या चित्रपटाचं भवितव्य. कित्येक जण त्यावरच ठरवतात सिनेमा पहायचाय की नाही. तरीही रोहित शेट्टीने सगळा सिनेमा ट्रेलर मध्येच सांगितला.. बरं सिंघम आणि सिंघम रिटर्न्स कोळून प्यायलेल्या फॅन्सना सिम्बा आणखी नवीन ते काय देणार..?? पण डायरेक्टर रोहित शेट्टी असला तर असे प्रश्न विचारायचे नसतात. ‘नॉस्टॅल्जिया’.. रोहित शेट्टी देतो आपल्याला नॉस्टॅल्जिया..!! कोल्हापूरच्या शिवगड पासून ते गोव्याच्या मिरामार पर्यंतचा एका अनाथ पोराचा प्रवास.. त्यात तो कसा शिकतो, काय शिकतो आणि काय शिकवतो ही कहाणी..!! लुच्चा पोलिसवाला कसा सिंघम ला शोभेल असा त्याचा बछडा सिम्बा बनतो हा त्या अनाथ मुलाचा प्रवास.. पण रणवीर सिंग हा प्रवास कुठेही कंटाळवाणा होऊ देत नाही. प्रत्येक सिन प्रेडिक्टेबल आहे.. पण ‘संग्राम भालेराव’ तो सिन कसा करेल ह्याची उत्सुकता वाटतेच..

 

READ ALSO :  ज्यांच्या सिनेमाचा ट्रेलरच अंगावर काटे आणतोय तो सिनेमा कसा असेल..!!??

संग्राम भालेराव म्हणजेच ‘सिम्बा’ रणवीरने परफेक्ट उभा केलाय. त्याच्या लहानपणीचा रोल करणारा मुलगा सुद्धा तितकाच चंट घेतलाय. केसांना चपचपीत तेल लावून, भांग पाडून, वर्दी न घालता, मिळेल तिथून मिळेल तसा पैसे कमवणारा भ्रष्ट पोलीस रणवीरने चांगला दाखवलाय. प्रत्येक सीन मध्ये रणवीरचा अभिनय भाव खाऊन जातो. ही ‘आऊट अँड आऊट’ रणवीर सिंग ची फिल्म असली तरी बाकीची पात्रही चांगली वठली आहेत. पण सगळ्यात जास्त मजेदार काय असेल तर मराठी अभिनेत्यांची जोरदार फौज आणि ‘मराठी’ वातावरण.. म्हणजे एकूण एका पात्राला एक तरी मराठी डायलॉग आहेच.. मराठी सिनेमात रणवीर सिंग आणि सारा अली खान काम करतायत असेही वाटून जाईल.

सिम्बाची मसालेदार चमचमीत रेसिपी तयार तर झालीये पण रोहित शेट्टीची टिपिकल फायटिंग आणि गाड्यांचा धुव्वा मात्र ह्यातून मिस्सिंग आहे. तरीही शेवटच्या काही क्षणात आपल्याला अपेक्षित असलेली सिंघमची एन्ट्री होते आणि मग मात्र ‘सिंघम टेक्स ओव्हर सिम्बा’..!! सिंघम तो सिंघमच आणि सिम्बा फार तर त्याचे पिल्लू.. गाण्यांच्या बाबतीतही तसेच आहे ‘आख मारे’ आणि ‘नही लगता दिल मेरा ढोलणा’ ही दोन्ही गाणी रिमिक्स आहेत. बाकीची दोन लक्षातही राहणार नाहीत. बॅकग्राऊंड स्कोर मात्र भन्नाट आहे. सिम्बा च्या प्रत्येक एंट्रीला जबरदस्त संगीत दिले आहे. कलाकारांच्या बाबतीत सुद्धा थोडा घोळच घातलाय.. इतके चांगले चांगले कलाकार घेतले आहेत पण त्यांच्या वाट्याला अगदीच दुय्यम भूमिका आली आहे. हॅन्डसम सौरभ गोखलेला हटके रोल मिळाला आहे आणि त्याचा त्याला पुढे फायदा होऊ शकतो. मात्र  सोनू सूद, नेहा महाजन, वैदेही परशूरामी, सुचित्रा बांदेकर, अरुण नलावडे आणि सारा अली खान ह्यांना फारसा वाव नाही. पण इतका सगळं असतानाही रणवीर सिंग च्या अभिनयाची आणि रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाची जादू झालीच.. एका महत्वाच्या आणि कायम ज्वलंत असलेल्या मुद्द्याला हात घातल्याने प्रेक्षकांची नस पकडली गेली आहे आणि त्या मुद्द्यावर सगळ्यांच्या आणि खास करून स्त्रियांच्या मनात काय भावना उठते त्याची चांगली मांडणी केली आहे. त्यावर उत्तरही चांगलेच दिले आहे. त्यामुळे चित्रपटातील ‘संदेशाचा प्रभाव’ थेटर सोडताना सगळ्यांच्या मनावर राहतो. त्या उप्पर आपल्याच आगामी दोन सिनेमांची जाहिरातही ह्यातच रोहित शेट्टीने सफाईने केली आहे. त्यामुळे ते सिनेमे कोणते आणि ‘आता माझी पण सटकली’ म्हणणाऱ्या रणवीर ची ऍक्शन कशी आहे हे दोन्ही तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author