मालवणी भाषेतील तडका आणि फणसासारखी सासू बाहेरून कडक आणि आतून मात्र गोड मऊ मधाळ, गौरीची आजी. जावयाची आणि सासूची शाब्दिक जुगलबंदी आपण ‘ काहे दिया परदेस ‘ या मालिकेतून पाहायला मिळाली. आजीच्या भूमिकेमुळे रसिक प्रेक्षकांच्या घरात घरात पोहचलेल्या शुभांगी जोशी यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या अभिनयाने सर्वांच्या लाडक्या बनलेल्या आजी, मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुभांगी जोशी यांच्या निधनामुळं यांच्या सहकलाकारांना धक्का बसला आहे. त्या ७२ वर्षाच्या होत्या.

शुभांगी जोशी यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. मागील आठवड्यात पॅरालिसीसचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आलं नाही. त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावतच गेली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

शुभांगी जोशी यांनी १९८४ साली निष्पाप या नाटकातून रंगभूमिवर पदार्पण केलं. त्यांनतर कुसूम मनोहर लेले या नाटकातील भुमिकाही गाजली. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्या अगदी कोणत्याही भुमिकेत चपखल बसायच्या.शुभांगी जोशी यांनी अनेक मालिकांमधून कामं केली आहेत. त्यांनी साकारलेली आभाळमाया मधील चिंगीच्या आजी म्हणजे  अक्काची भुमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.

 

READ ALSO : सुभद्राचे सामाजिक कार्य

सध्या कलर्स वाहिनीवरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती.

मालिकांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटाची बरेच काम केले. पण त्यांची आजीची भूमिका एक वेगळी अशी सर्वांवर छाप सोडली. त्यांच्या आजीच्या भूमिकेमुळे त्या सर्वात लोकप्रिय आजी ठरल्या.

खऱ्या आयुष्यात देखील आजी तितक्याच प्रेमळ होत्या. त्यांची लोकप्रियता फक्त प्रेक्षकांसाठी नव्हे तर त्यांच्या सहकलाकारांमध्येही होती. प्रत्येक मालिकेत त्यांनी अभिनयाबरोबर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची       अभिनयाची कारकीर्द हि खूप मोठी आहे , पण त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांपैकी त्यांच्या अभिनयाची कारकिर्दमधील त्यांची विशेष भूमिका गाजलेल्या त्या म्हणजे त्यांनी साकारलेल्या आजीच्या भूमिका, आजीच्या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय देत. आजीची भूमिका साकारताना त्या सर्वांच्या आजी झाल्या. आज सर्व चित्रपट सृष्टीत  त्यांचा निधनाने शोकाकुल वातावरण आहे.

अशा सर्वांच्या लाडक्या आजीला फिल्मीभोंगा मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...