सुभद्राचे सामाजिक कार्य

सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्स वरील वेबसिरीजमुळे बरीच कलाकार मंडळी प्रकाश झोतात आली , त्यापैकी एक राजश्री देशपांडे. हि राजश्री देशपांडे तुम्हाला नक्कीच आठवत असणार गणेश गायतोंडेच्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. एक निडर, बेधडक, स्पष्टवक्ती, परिस्थितीसमोर न झुकणारी, स्त्री. गायतोंडेला जरी सर्व त्याचे सहकारी घाबरत असले तरी वेळ पडल्यास त्याला चार समजुतीचे शब्द सांगणारी कडक व्यक्तिरेखा तिने साकारली होती. पडद्यावर बेधडक  वावरणारी सुभद्रा हि खर्या आयुष्यात देखील बेधडक आणि समजूतदार आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात अभिनय करताना सामाजिक भान ठेवून आपण काहीतरी या समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रेरित राजश्रीने ‘नभांगण ‘ या संस्थेची स्थापना केली. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सतत प्रयंत्न करत आहे. राजाश्रीला अगदी लहानपणीच समाजकार्याचे बाळकडू मिळाले, ते म्हणजे तिच्या आई व तिच्या बहिणीकडून राजश्रीने तिच्या आईला व बहिणीला समाजकार्य करताना अगदी जवळून पहिले आहे. राजश्री हि मुळची पुण्याची आहे पण कामानिमित्त ती मुंबईत आली. नाटकाच्या तालीम व वाचन यातून तिला बराच वेळ मिळायचा. अशातच तिने नेपालमधील भूकंप ग्रस्तांच्या मदत कार्यात तिने सहभाग घेतला. त्यातून तिची समाजातील विविध प्रश्नाबाबतची आवड वाढत गेली. कालांतराने महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळामुळे शेतकरी व सामान्य लोक यांची झालेली दैना यामुळे ती खूप बैचेन झाली. तसेच पावसाभावी तिच्या वडिलांना शेती सोडावी लागली होती, याची तिला आठवण होती, त्यामुळे तिचा निर्धार पक्का  झाला व दुष्काळग्रस्त लोकांसाठी काहीतरी करायचे असे तिने ठरवले.

कामाची सुरुवात करण्यासाठी तिने संपूर्ण मराठवाडा पालथा घातला आणि मग तिला पाण्याअभावी कामे रखडलेल्या लोकांच्या समस्येविषयी माहिती मिळाली आणि तिच्या कामाची सुरुवात ‘पंढरी’ या गावापासून झाली. त्या गावात बहुतेक लोकांकडे शौचालय नव्हती. सरकारी अनुदान असूनही काही गैरसमजुती, अपुरे शिक्षण, बेरोजगारी त्यामुळे बरेच तंटे आणि प्रश्न त्यांच्या समोर होते. त्यापैकी एक मोठी समजूत म्हणजे शौचालयासाठी बरेच पाणी लागते. शेतीसाठी पाण्याची समस्या असताना कोणीही शौचालय बांधण्यासाठी तयार होत नव्हते. सरकारी योजनेबाबत त्यांच्या फारच औदासिन्य होते. अशा गावात जावून लोकांचे परिवर्तन करणे व त्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे फारच जिकरीचे काम होते. राजश्रीने त्या गावात जावून तेथील लोकांच्या समस्या जाऊन घेतल्या, त्यांची भांडणे सोडवली, शाळेतील मुलांच्या कविता ऐकल्या, त्यांना गोष्टी सांगितल्या अशा पद्धतीने त्यांचा विश्वास जिंकला आणि तिच्या कामाला सुरुवात झाली.

हे काम करता असताना तिला बर्याच समस्या आल्या. लोकांना स्वच्छातेचे महत्व पटवून देणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या ढोबळ कामामुळे होणार्या गैरसोई, अशा गोष्टींचा सामना करत तिने तिचे कार्य सुरु ठेवले. शौचालय बांधणे, पावसाचे पाणी साठवणे, गावातील स्त्रियांसाठी लघुउद्योग जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करणे, शाळा उपलब्ध  करणे. सध्या नभांगण पंढरी व मठ ह्या दोन गावांवर लक्ष केंद्रित केले असून तेथील शिक्षण, शेती, आरोग्य याबाबत चांगल्यासोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अभिनय क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत असतांना सामाजिक भान ठेवून समाजासाठी झटणाऱ्या राजाश्रीला  फिल्मिभोंगा मराठीकडून सलाम !

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...