भयंकर आजार असूनही का आहे सोनाली इतकी खुष?

आंखोमे बसे हो तुम, 

तुम्हे दिल मे छुपा लुंगी..

ह्या गाण्यावर चाहत्यांना आपल्या दिलखेचक अदांनी खुश करणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे एका भयंकर आजाराशी सामना करतेय. सध्या ती भारतात परत आलीय. कोणाला ना कोणाला कॅन्सरची लागण झाल्याच्या बातम्या आपण रोज ऐकत आहोत आणि एकदा का कॅन्सर झाला की हताश होऊन सरळ मृत्यूची वाट पाहणाऱ्या रुग्णांना ही सदाबहार अभिनेत्री नक्कीच प्रेरणा देत आहे. 

चार-चौघींसारखाच पण तरीही मोहक चेहरा, मुलींना हेवा वाटेल अशी उंची आणि कमनीय बांधा असलेली सोनाली हिंदी सिनेसृष्टीत खूप वर्षांपासून आपलं नशीब आजमावत आहे. ऍक्शनपटांच्या युगात फक्त ग्लॅम-डॉल म्हणूनच वाव असताना तिने सरफरोश, दिलजले, हम साथ साथ है असेही सिनेमे करून चाहत्यांना चकित केले. 

पंजाबी दिग्दर्शकाशी लग्न करून ती आता या क्षेत्राला टाटा बाय बाय करेल असे वाटत असताना तिने वेगवेगळ्या रिऍलिटी शोजमध्ये परीक्षकांची भूमिकाही पार पडली. इतकेच नाही तर अनेक जाहिरातींमध्ये पण काम करणे चालू ठेवले. जाहिरात असो, टीव्हीवरचा शो असो किंवा थिएटरमधील पडदा, सतत हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याची ही अभिनेत्री अचानक खूप मोठ्या आजाराने ग्रस्त झाल्याची बातमी व्हायरल झाली. 

 

READ ALSO : शुक्रवारची फिल्मी मज्जा

सुरुवातीला प्रसिद्धीत राहण्याचा अट्टाहास असेल अशाप्रकारे जरा चेष्टेचा विषय ठरलेला हा आजार खरोखरीच शेवटच्या स्टेजचा असल्याचे निष्पन्न झाले. हिंदी सिनेमात जिला वाचवायला कायम हिरोला एन्ट्री घ्यावी लागते इतपतच महत्त्व असलेल्या ह्या अभिनेत्रीने मात्र आयुष्याच्या ह्या दुसऱ्या बाजूशी चांगलेच दोन हात करून, तीही फायटर असल्याची ग्वाही दिली. 

कॅन्सरची ट्रीटमेंट तशी खूपच त्रासदायक असते. केमोथेरपीनंतर शरीराला असंख्य वेदना होतात. सुंदर चेहरा विद्रुप होतो. स्त्रियांचा नैसर्गिक दागिना म्हणजे सुंदर ‘केस’ तेही गळतात, अगदी भुवयासुद्धा. आणि हा भयंकर कॅन्सर बरा होईल की नाही ह्याचीसुद्धा कोणी शाश्वती देत नाही. अशा परिस्थितीत सोनाली न्यूयॉर्कला, घरापासून खूप दूर, काही महिने राहून रोगाशी लढतेय. केस गळाले तरी सुंदरसा टोप लावून तिने तिचे हसरे फोटो इन्स्टाग्राम वर टाकलेत. वेदना होत असतानाही चेहऱ्यावर त्याचा लवलेश दिसणार नाही असेच तिचे फोटो पाहून वाटते. 

आपल्याला खूप मोठा आजार झालाय आणि तो जीवघेणा ठरू शकतो ही कल्पनाच आपल्याला जगणे सोडण्यास प्रवृत्त करते. त्यातून प्रेमाच्या, मैत्रीच्या आणि माणुसकीच्या नात्याने अनेक जण आपल्यासाठी प्रार्थना करतायत. आपण लवकर बरे व्हावे ह्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतायत. हे जरी खूप सुखावह असले तरी, जो आजार झालाय आणि त्यामुळे जो परिणाम होऊ शकतो त्याची आठवण सतत करवून दिल्यासारखे नक्कीच त्या रुग्णाला वाटत असणार.

सोनालीने मात्र हे सगळे खूप खिलाडूवृत्तीने घेतलेले दिसते. प्रियांका चोप्राने तिला छान केसांचा टोप बनवून दिला, तिला भारतातून न्यू यॉर्कला, चित्रपट सृष्टीतील तिचे मित्रमैत्रिणी भेटायलाही गेले आणि त्यांच्या सोबत आपला जीवघेणा आजार विसरून सोनाली ते क्षण भरपूर जगले. आयुष्य किती आहे हे कोनालाही माहीत नसते आणि एखाद्या रोगामुळे तर ते लवकरच संपेल की काय ह्याची भीती तर जास्तीच असते पण ह्या सगळ्यावर मात करून सोनाली आयुष्य छान जगतेय. आता ती भारतात आलीय. केस नसलेले गुळगुळीत टक्कलसुद्धा ती सौंदर्याचाच भाग असल्याप्रमाणे मिरवतेय. त्यात काहीच गैरदेखील नाही. ती अजूनही तशीच सुंदर दिसत आहे.

अजूनही तिचा रोग पूर्ण बरा झाला नसल्याची चर्चा आहेच. तिला पुन्हा पुढच्या ट्रीटमेंटसाठी अमेरीकेला परत कधीही जावं लागू शकतं. पण अशा स्वच्छंदी स्वभावाच्या सोनाली वर ह्याचा काही परिणाम नक्की होत नाहीय. ‘जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीये’ ह्या उक्तीप्रमाणे सोनाली मस्त जगतेय. ती नेहमीप्रमाणे हसतमुख राहून लवकर बरी व्हावी ह्यासाठी फिल्मिभोंगा मराठीकडून खूप खूप शुभेच्छा..!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author