कबड्डी कबड्डी कबड्डी, ने घडवलंय अनेक टवाळखोर मुलांना जबाबदार आणि, कुशल खेळाडू.

कबड्डी कबड्डी कबड्डी, ने घडवलंय अनेक टवाळखोर मुलांना जबाबदार आणि, कुशल खेळाडू. सूर सपाटाचा टीझर खूप काही सांगतोय..!!

शाळेत असताना वर्गातल्या ३०/४० मुलांमध्ये ३/४ मुलं तरी असतात टवाळखोर, टारगट, बथड डोक्याची. त्यातले कोणी इतर मुलांना त्रास देतात, तर काही शिक्षकांनाच त्रास देतात, तर काही सगळ्या वर्गावरच दहशत गाजवतात. इतर मुलं त्यांना जरा टरकून असतात. तर काही शिक्षक त्यांना त्यांच्या टारगटपणामुळे नेहमी शिक्षाच करत असतात. असली मुलं बहुतेक सगळ्या शाळांमध्ये असतात, विशेष म्हणजे सरकारी शाळांमध्ये जास्त असतात. कारण गावभर भटकून रोज कुणाच्या तक्रारी येण्यापेक्षा त्यांना शाळेत अडकवून टाकलं की त्यांचे आईवडील जरा सुटका करवून घेतात. पण ही मुलं टारगट म्हणून त्यांना शाळेत सुद्धा हुडूत हुडूत केलं गेलं तर ती आणखीनच आक्रमक बनतात.

जर त्यांच्यातल्या दुर्गुणांवर पांघरूण घालून त्यांच्यातल्या चांगल्या गुणांना ओळखून त्यांच्यावर काही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी ते चांगली पार पाडतात. इतरांपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवतात. आणि त्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक झालं तर आणखी काही मोठी जबाबदारी सुद्धा ते घेऊन यशस्वी होतात, आणि त्या यशामागे त्यांचे दुर्गुण लपून जातात आणि काही काळ गेल्यावर त्यांच्यात हळू हळू बदल झालेला दिसायला लागतो. आणि तशी मुलं चांगले, जबाबदार, विश्वासू, विद्यार्थी बनतात. पण हे घडवायला तसे शिक्षक सुध्दा प्रयत्न करणारे हवे असतात. अभ्यासात कच्चे असलेले विद्यार्थी खेळात चांगलं नाव कमावतात. किंवा दुसऱ्या कुठल्या कलेत खूप यश मिळवतात. ध्येय गाठतात

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

खेळ आणि गाजलेले कितीतरी खेळाडू आपण पाहिलेत त्यांच्यावर काही चित्रपट सुद्धा आलेत. अशाच काही उनाड पोरांना एकत्र आणून त्यांच्यातल्या कलेला वाव देऊन अफलातून कामगिरी करून घेणारे त्यांचे शिक्षक ह्या वेगळ्या प्रकारच्या नात्याला समोर आणणारा एक चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचं नाव आहे “सूर सपाटा”. कबड्डीच्या खेळातून ह्या उनाडक्या करणाऱ्या मुलांना त्यांच्यातल्या कौशल्याचे पैलू दाखवून त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे आदर्श शिक्षक, आणि उनाडक्या विसरून तयार झालेले हे जबाबदार आणि कुशल खेळाडू. जिल्हा परिषदेची शाळा, पण कसली भारी कबड्डीची टीम तयार करू शकते, फक्त विद्यार्थ्यांमधल्या खऱ्या कौशल्य गुणांवर, आणि खेचून आणते विजयश्री. वाढवते त्या मुलांमधला आत्मविश्वास, आणि विसरायला भाग पाडते त्यांच्यातले दुर्गुण. असा काही वेगळं आणि सकारात्मक चित्र तयार करणारा हा चित्रपट येतो आहे.

ह्या चित्रपटात भरपूर कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मुख्य भूमिकेत राष्ट्रीय पुरस्कार विजेता, छोटा कलाकार, ‘हंसराज जगताप’ आहेच, शिवाय यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रूपेश बने, जीवन कराळकर, सुयश शिर्के, निनाद तांबवडे, साथीला शरयू सोनवणे ही कबड्डीची टीम आहे. ह्या शिवाय २५ गाजलेले कलाकार आपल्याला समोरा समोर आलेले पाहायला मिळणार. कोण आहेत ते कलाकार हे तुम्ही थिएटर मधेच पहा.

कबड्डी ह्या खेळाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला सर्वोच्य ‘अर्जून’ पुरस्कार मिळाला तो ‘शांताराम जाधव’ ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या पाठीमागे उभा राहिला म्हणून ‘कबड्डी’ वर आधारलेला हा सिनेमा यशस्वी वाटचाल करणार आहे ह्यात शंकाच नाही. आणखी जवळजवळ ३०० गाजलेले कबड्डीपटू ह्या सिनेमात झळकणार आहेत. मग तर हा खरा खुरा कबड्डी सामना किती रंगतदार होणार आहे ह्याची कल्पना करा, आणि २२ मार्च २०१९ ह्या दिवशी सगळीकडे प्रदर्शित होणारा हा भन्नाट चित्रपट पाहायला विसरू नका. ‘सूर सपाटा’

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author