“गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?” या गाण्यामागची कहाणी…

“गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?” या गाण्यामागची कहाणी…

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमातील “गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?” हे गाणे तुम्ही पाहिले का? जुन्या गाण्याचं अश्या प्रकारे नव्या स्वरुपात चित्रीकरण केल्यानंतरही ते गाणं तितकंच श्रवणीय आणि तितकंच प्रेक्षणीय होणं याचं श्रेय केवळ आणि केवळ त्या गाण्याच्या संपूर्ण टीमलाच जातं. ओरीजनल गाण्यात दस्तुरखुद्द डॉ. घाणेकर आणि आशा काळे यांनी केलेली धमाल नवीन गाण्यातसुद्धा तितकीच धमाल उडवताना दिसत आहे. तुम्ही जर ओरीजनल गाण्याच्या प्रेमात असाल तर नवीन गाणंदेखील तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही हे अगदी पैजेवर सांगता येईल.

१९८० च्या दशकात प्रियकराने आपल्या प्रेयसीला प्रपोज करणं तसं धाडसाचंच म्हणावं लागेल. त्या काळातील अनेक तरुणांना अश्या प्रकारे लाडीकपणे प्रपोज करायला उद्युक्त आणि अगदी प्रोत्साहित करणारं माध्यम या गाण्याच्या स्वरुपात उपलब्ध करून देवून या गाण्याच्या निर्माणकर्त्यांनी त्यांच्यावर अनंत उपकार केल्याची भावना नक्कीच निर्माण झाली असेल.

 

READ ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

खरं पाहता मुळात ‘हा खेळ सावल्यांचा’ या सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटात अश्या प्रकारचं प्रेमगीत असणं हेच कौतुकास्पद आहे. त्यातच पडद्यावर काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांचा लाडीकवाळा अभिनय, सुप्रसिद्ध गायक हेमंतकुमार आणि आशा भोसले यांचा स्वरसाज, गीतकार सुधीर मोघे याचं गीत आणि त्यावर संगीताची अजरामर कलाकुसर केली पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. पडद्यावरील दोघेही रूढार्थाने कसलेले नर्तक नसतानाही पडद्यावर मात्र ते गाणं अतिशय गोड वाटतं.

या अजरामर गीताला पुन्हा नव्या स्वरुपात पाहताना तोच आनंद आपण नक्कीच अनुभवत असाल यात काहीच शंका नाही. यावेळेस पडद्यावर सुबोध भावे आणि प्राजक्ता माळी यांनीही ते तितक्याच ताकदीने पेलल्याचं दिसत आहे. पडद्यावर सुबोधच्या जागी डॉ. घाणेकर आणि प्राजक्ताच्या जागी आशा काळे यांची क्षणोक्षणी आठवण होत राहते. तुमच्यापैकी काहीजणांना जुना आणि नवीन गाण्याचा व्हिडीओ बाजूबाजूला चालवून त्यांच्या नृत्याच्या स्टेप्स अनुभवण्याचा मोह नक्कीच झाला असेल आणि त्यामुळेच फुलवा खामकर याचं नृत्य दिग्दर्शन नक्कीच वाखाणण्याजोगं आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर चित्रपट करणं हे आपल्याला दिसतं तितकं साधं आणि सोप्पं काम निश्चितच नाही. परंतु हे शिवधनुष्य पेलण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल आणि आताच्या नवीन पिढीला जुन्या जाणत्या कलाकारांची आणि गाण्यांचीही नव्याने ओळख करून दिल्याबद्दल निर्माते व्हायाकॉम१८ मोशन पिक्चर्स आणि दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांचे मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author