‘अ ब क’ चित्रपटाद्वारे सुनिल शेट्टींचं मराठीत पदार्पण

‘अ ब क’ चित्रपटाद्वारे सुनिल शेट्टींच मराठीत पदार्पण

      सैराटने १०० कोटीचा आकडा काय पार केला.. बॉलीवूडमधील दिग्गजांनी मराठी सिनेसृष्टीत नशीब आजमावण्याचा सपाटाच लावलाय. प्रियांकाने मराठी चित्रपट बनवून बक्कळ पैसा कमावला आहे, तर माधुरी दिक्षित हि अभिनेत्री म्हणून पहिल्यांदाच ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाद्वारे मराठीत एंट्री मारतेय.. तर निर्माता म्हणून जॉन अब्राहम आणि माधुरी दिक्षित यांनी त्यांच्या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा देखील केलेली आहे.           करण जोहर हि मराठी सिनेसृष्ठीत व्यवसायाची चाचपणी करतोय. इतक्या सगळ्या घटना घडत असताना बॉलीवूडचा आण्णा सुनील शेट्टी कसा बरं मागे राहील! गेल्या वर्षीच त्याने आपल्या ‘अ ब क’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली होती… आणि आता त्याच चित्रपटातील गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. ह्या गाण्याचे बॉल हिंदीमध्ये आहेत.

हे गाणं गायलंय ‘राजा हसन’ या गुणी गायकाने. ज्याने ‘सा रे ग म प’ २००७ च्या अंतिम फेरीत पोहोचत, दुसरा क्रमांक पटकावला होता. तसेच ‘सरकार’, ‘सरकार राज’ सारख्या चित्रपटांना संगीत दिलेले संगीतकार Bapi–Tutul यांनी हे गाण संगीतबद्ध केलेलं आहे. गीत लिहिलंय कौशल किशोर यांनी आणि बोल आहेत…

न्याय दिलानेवाला,

जुल्म मिटानेवाला,

मजबूरों का मसीहा,

मजलूमों का रखवाला,

जिसके दरबार से न कोई खाली जाता I

ऐसी हुंकार है,

ऐसा प्रहार है,

जलता अंगार है,

तेरी जयकार है I

तू ही सरकार है I

तू ही मददगार है I

जग में न जिसका कोई,

‘बाप्पा’ उसका सहारा I

हे गाणं सुनील शेट्टी यांच्यावर उत्कृष्ठरित्या चित्रित ही केलं गेलेलं आहे. यात सुनील शेट्टी ‘बाप्पा’ नावाच्या दमदार व्यक्तीच्या भूमिकेत पाहायला मिळतात. जे वैश्यावस्तीत जाऊन तिथे पळवून आणलेल्या एका लहान मुलीला वाईट लोकांपासून वाचवतात. सांगितलं जातंय कि हा चित्रपट ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या मोहिमेचा पुरस्कर्ता आहे. सुनील शेट्टी यांना हे मनापासून वाटतं कि, “मराठी प्रेक्षक चित्रपट पाहण्याच्या बाबतीत अगदी चोखंदळ असतो. चांगला आशय असेल्या चित्रपटांनाचं मराठी प्रेक्षक आपली पसंती दर्शवतो. उगाच मनोरंजनाच्या नावाखाली बनविलेल्या धांगड धिंग्याला मराठी प्रेक्षक कधीच पसंती देत नाही.”

मिहीर कुलकर्णी निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय रामकुमार शेडगे यांनी तर या चित्रपटाचे लेखक आहेत आबा गायकवाड. मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.