‘सूर सपाटा’ चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा

‘सूर सपाटा’चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा

लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि या निर्मितीसंस्थेने आपल्या पहिल्या-वहिल्या ‘पेइंग घोस्ट’ या चित्रपटाद्वारा मनोरंजनक्षेत्रात यशस्वी षटकार मारला होता आणि आत्ता घेऊन आलेल्या सूर सपाटा’ या दुसऱ्या चित्रपटाने सध्या चित्रसृष्टीत उत्सुकता वाढवलेली आहे. गावठी कबड्डीवर आधारित ‘सूर सपाटा’मधून एक ना दोन तब्ब्ल २५ हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकारांची मांदियाळी रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘सूर सपाटा’ 21 मार्चला होळीच्या निमीत्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार असून तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ची खास झलक काल आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा दरम्यान पाहता आली. अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शकुंतला खटावकर,माया अकरे मेहेर आणि शिव छत्रपती पुरस्कार शैला रायकर, ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे सूर सपाटा’ची संपूर्ण टीम यांच्या हस्ते ‘सूर सपाटा’चा उत्कंठावर्धक ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा करण्यात आला.

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती या चित्रपटातील कलाकारांची. या गुलदस्त्यातील सर्व नावं समोर आली असून हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे, नेहा शितोळे याची वर्णी लागली आहे. ‘सूर सपाटा’च्या ट्रेलर लॉण्चच्या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी ही सर्व मंडळी आवर्जून उपस्थित राहिली हे विशेष. शिवाय हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर व ‘सूर सपाटा’ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

नचिकेत जोग लिखित ओंकार केळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सुरेश वाडकर, वैशाली सामंत, पं. संजीव अभ्यंकर, सावनी रवींद्र, ज्ञानेश्वर मेश्राम, ऋषिकेश रानडे, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, क्रीशा चिटणीस, ओंकार केळकर, आर्या आंबेकर यांचा सुरेल आवाज लाभला आहे. तर अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, प्राजक्ता माळी, संस्कृती बालगुडे, नुपूर दैठणकर, विजू माने, मेघराज राजेभोसले, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, नयन जाधव, सुनील गोडबोले, देविका दफ्तरदार, सिद्धेशर झाडबुके, सौरभ गोखले, किरण यज्ञोपवित, मिलिंद शिंत्रे, बिग एम जे संग्राम, श्रीकांत यादव, विजय पटवर्धन, मालविका गायकवाड, विनोद सातव, विनोद खेडकर, देवेंद्र गायकवाड, योगेश जाधव आदी ३८ कलाकार या विशेष गाण्यात दिसणार आहेत. हे गाणे डॉ. रमेश खाडे यांच्या चार्ली स्टुडीओत शूट झाले असून मयूर जोशी कॅमेरामन आहेत. तर शिवरंजनी स्टुडीओ मध्ये गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले आहे.

आपण १ मार्च रोजी कुठे आणि कसा ‘रोटी डे’ हा उपक्रम साजरा करणार आहात हे आपल्या नावासह मदतीचे स्वरूप स्पष्ट करत rotidayindia@gmail.com या मेल आयडीवर कळवावे असे आवाहन अमित कल्याणकर याने केले आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author