मित्रांनो, लवकरच आपल्या ‘डोक्याला शॉट’ द्यायला येणार आहेत प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशी.!!

नुकतेच बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शूट केलेली प्राजक्ता माळी सध्या कलासृष्टीचे तापमान वाढवत आहे. त्यातच टीव्हीवर सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या नवीन तुफान विनोदी कार्यक्रमाच्या संचालनाची धुराही ती सांभाळत आहे. तर सांगायचा मुद्दा असा की तिने चांगलीच कात टाकली आहे. ती गोडसोज्वळ चेहऱ्याची प्राजक्ता माळी गायब झाली असून तिने नवीनगर्ल नेक्स्ट डोअरचा अवतार धारण केला आहे आणि तिला तो शोभतही आहे. काल पर्वा पर्यंत घरंदाज सून बाई म्हणून सिरीअल्स मध्ये कामं करणारी, दही हंडीमंगळागौरीच्या सुपाऱ्या घेणारी आपली प्राजक्ता आता डॅशिंग रुपात वावरत आहे. तसेही सध्या मेकओव्हरचे वारे जोरदार वाहात आहेत. अर्चि म्हणजेच रिंकू राजगुरुणे नाही का आपले रूप पालटले..??!! मग प्राजक्ता कशी मागे राहील. या रुपेरी कलासृष्टीत अपडेटेड राहिलं तरच आपलं नाणं खणखणीत वाजवता येतं हेही तितकंच खरं आहे

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

असो पण ही नव्या रूपातली प्राजक्ता लवकरच डोक्याला शॉट द्यायला येणार आहे. म्हणजे काय म्हणता..?? अहो ती सुव्रत जोशी बरोबर आता एका सिनेमात झळकणार आहे. डोकयाला शॉट ह्या नावावरूनच सिनेमाचा अंदाज लावता येईल. विनोद आणि कन्फ्युजन ची सरमिसळ असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या डोक्याचं दही करेल असे वाटते. पण करमणूक शंभर टक्के होणार कारण कलाकारच असे आहेत. आता सुव्रत जोशी देखील सगळ्यांना माहीतच आहे. दिल दोस्ती दुनियादारी सोबत तो सगळ्या घरात आणि तरुणींच्या हृदयात कधीच पोचला आहे. मिश्किल हास्य आणि लोभस चेहरा त्यातून अभिनयात निपुण असा सुव्रत आणि त्याला तोडीस तोड प्राजक्ता म्हणजे पडद्यावर एक नवीन विनोदी जोडी पाहण्यास धमाल येणारे हे नक्की.. 

बालक पालक आणि यलो ह्या चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर हे आताडोक्याला शॉटची निर्मिती करणार म्हणजे यशाची पायरी आधीच चढल्यासारखे आहे..! चित्रपटाचे फर्स्ट लुक म्हणजेच त्याचं पोस्टर मस्त रंगीबेरंगी दिसत आहे आणि त्यात इतर कलाकार रोहित हळदीकर, गणेश पंडित आणि ओंकार गोवर्धन देखील काहीतरी अतरंगी कलाकारी सादर करतील असे वाटते.. एका पोस्टरमुळेच इतकी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की आता चित्रपट कधी येतोय ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर मंडळी सुव्रत आणि प्राजक्ता ह्यांच्या धम्माल जोडगोळीच्या करामती पाहायला जरा कळ काढा..

मग डोक्याला शॉट लागणारच आहे..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...