ज्यांच्या सिनेमाचा ट्रेलरच अंगावर काटे आणतोय तो सिनेमा कसा असेल..!!??

ज्यांच्या सिनेमाचा ट्रेलरच अंगावर काटे आणतोय तो सिनेमा कसा असेल..!!?? 

 

सध्याची फिल्मी वर्तुळातली सगळ्यात गरम चर्चा कुठली असेल तरठाकरेह्याच सिनेमाची. हयात असताना आणि आता नसतानाही अजूनही लोकांच्या हृदयात स्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरेविषयी कशीही कुठूनही कहाणी ऐकायला मिळाली तरी अंगात स्फुरण चढते. असे वादळी व्यक्तिमत्व तीन तासांच्या सिनेमात बसवणे खरे तर अशक्यच. पण तरीही त्यांच्या जीवनातील ठळक घडामोडी घेऊन संजय राऊत प्रोडक्शन ने अभिजित पानसे ह्यांच्या दिग्दर्शनाखाली पुन्हा एकदा एक मोठे पाऊल उचलले आहे. आधी बाळकडू नावाचा सिनेमा ह्याच प्रोडक्शन खाली बनवला गेला होता. पण ठाकरे ह्या सिनेमाची जादू वेगळीच असणार

नावाझउद्दीन सिद्दीकी हे सध्याचं चलतीतलं नाणं. आणि अभिनयाच्या आयुष्यात असा दमदार रोल मिळणे म्हणजे नवाझ सारख्या कलाकाराला पर्वणीच.. बाळासाहेबांच्या लकबी आत्मसात करून आणि त्यांच्या आवाजाचा लेहजा पकडून त्यांचे पात्र हुबेहूब पडद्यावर आणणे हे कसबच आहे आणि ठाकरे सारखा मुत्सद्दी राजकारणी उभा करणे हे देखील एक शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. पण नवाझ आणिठाकरेसिनेमाच्या टीमने हे काम सुरू केले. कालच हिंदी आणि मराठीचे ट्रेलर लाँच केले. जेव्हा टिझर आले होते तेव्हाच खरे तर लोकांची उत्सुकता चाळवली होती. आता तर सिनेमा कधी पाहायला मिळतोय ह्याची उत्कंठा शिगेस पोहोचली आहे हे नक्की. त्यातून नवाझ सारखा मुरलेला कलाकार. त्याला ट्रेलर मध्ये पाहूनच जाणवतंय की ठाकरे युग पुन्हा पडद्यावर बघायला मिळणार आहे.

 

READ ALSO :  आपल्या ‘डोक्याला शॉट’ द्यायला येणार आहेत प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशी.!!

हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषेत आपल्याला सगळा थरार अनुभवायला मिळणार. हिंदी चित्रपटात नावाझउद्दीनचा स्वतःचा आवाज वापरला आहे पण मराठी चित्रपटात त्याचे डब्बिंग सचिन खेडेकर ला दिले गेले आहे असे वाटते. तसे असल्यास प्रेक्षकांना हे जरा खटकू शकते. करण सचिन खेडेकरांच्या आवाजात तो लेहजा नाही. तरीही ठाकरे समोर असताना ह्या छोट्या मोठ्या चूका नक्कीच दुर्लक्षिल्या जाऊ शकतात. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांपासून ते राजकारणात प्रवेशा पर्यंत ठाकरे हे अद्भुत व्यक्तीमत्व कसे होते आणि त्यांची अफाट लोकप्रियता का आहे हे सगळेच चित्रपटातून उलगडले जाणार आहे. हे बायोपिक असले तरी नवाझला नेहमीप्रमाणे आपली अदाकारी दाखवायला मिळणार आहे. सौ मीनाताई ठाकरेंचा रोल अमृता राव करणार आहे. त्यामुळे बराच काळ चित्रपट सृष्टीतून गायब असलेल्या अमृताला पुन्हा एकदाठाकरे पत्नींच्यापात्रास शोभेल असा संयमित अभिनय करताना तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. एकूण ट्रेलर तरी दमदार बनला आहे. आता फक्त वाट पाहिली जातेय ती सिनेमाच्या रिलीज होण्याची.. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र चा नारा घुमण्याची..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author