‘थापाड्या’ येतोय नवीन वर्षाच्या स्वागताला..!

 ‘थापाड्या’ येतोय नवीन वर्षाच्या स्वागताला..!

 

थाप मारणे..!! तबल्यावर आणि कोणाच्या तोंडावर.. तबल्यावरची थाप सुरेल असते पण कोणाच्या तोंडावर थापा मारायला जास्तीचं कौशल्य लागतं..!! तुम्ही कधी मारली कुणाला थाप? जर तुम्ही पट्टीचे थापडे असाल तर पचणारे तुमची थाप.. नाहीतर तुम्ही तोंडावर आपटनार हे नक्की..!! आपल्या आजूबाजूलाही भरपूर थापडे फिरत असतात. थाप मारताना धमाल मज्जा येते, आपल्या थापेवर समोरच्याची रिऍक्शन बघायला हो ना..?!! मग लवकरच येतोय एक भन्नाट ‘थापाड्या’ तुम्हाला भेटायला. 

मानसी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, मास्क ग्रुप प्रस्तुत धमाल विनोदी, फुल टू मनोरंजन करणारा, अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ हा मराठी चित्रपट येत्या ४ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. भाऊसाहेब भोईर, शरद म्हस्के यांची निर्मिती असलेल्या ‘थापाड्या’मध्ये अभिनेता अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड,ब्रिंदा पारेख, मोहन जोशी, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, दीपक करंजीकर, सुनील गोडबोले, विनीत भोंडे, संतोष रासने, प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर वास्तूतज्ज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत. ह्यातले अर्धे अधिक कलाकार अस्सल विनोदाच्या पाकात मुरलेले आहेत असे म्हणायला हरकत नाही.. आता सोशल मिडीयावर प्रदर्शित झाल्यावर हा ‘थापाड्या’ चांगलाच वायरल होऊ लागला आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लुकला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ हा एक रॉमकॉन शैलीतील चित्रपट आहेच. पण ह्यात एक सस्पेन्स आणि थ्रीलरचाही एक आगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. अशा सगळ्या रसांनी युक्त चित्रपटात लावणीची अदाकारी झटका देऊन जाणार आहे. 

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

‘थापाड्या’ची कथा, संकल्पना भाऊसाहेब भोईर यांची, कथा नितीन चव्हाण यांची तर पटकथा, संवाद समीर काळभोर यांचे आहेत. गीतकार गुरु ठाकूर, अभय इनामदार, मंदार चोळकर आणि जयंत भिडे यांच्या गीतांना संगीतकार पंकज पडघन, चैतन्य आडकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर गायक आदर्श शिंदे, बेला शेंडे, आनंदी जोशी,सायली पंकज यांचा स्वरसाज गाण्यांना चढला आहे. चित्रपटाचे डीओपी सुरेश देशमाने आहेत, तर नृत्यदिग्दर्शन  लॉजिनिअस, फुलवा खामकर, निकिता मोघे यांचे आणि कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. निर्मिती सहाय्य संतोष शिंदे, तर निर्मिती सूत्रधार डिंपल जैन आहेत. इतक्या सगळ्या अलंकारांनी नटलेला हा ‘थापाड्या’ नक्की कोण आहे? हे येत्या ४ जानेवारी २०१९ रोजी बघायला विसरू नका..!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author