…म्हणून नसिरुद्दीन शाह मराठीत मोठ्या भूमिका स्वीकारत नाहीत

म्हणून नसिरुद्दीन शाह मराठीत मोठ्या भूमिका स्वीकारत नाही

मराठी सिनेसृष्ठी व नाट्यसृष्टीबद्दल आत्मीयता असलेले, तसेच मराठी नाटक, चित्रपटांविषयी वारंवार आपल्या मुलाखतीतून गौरवोद्गार काढणारे, सुप्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना मराठी चित्रपटात मुख्य भूमिका करायची इच्छा आहे. ३ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी या आधी हि मराठी चित्रपटात छोट्या भूमिका केलेल्या आहेत. २०११ साली उमेश कुलकर्णीच्या ‘देऊळ’ या चित्रपटामध्ये एका ‘घायाळ डाकूची’ भूमिका साकारून नसिरुद्दीन शाह यांनी मराठी सिनेसृष्ठीत आपलं खातं उघडलं होतं. छोटी भूमिका तसेच स्क्रीनटाईम हि कमी असलेल्या या भूमिकेत हि नसिरुद्दीन शाह यांनी आपली छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवलीच. यानंतर त्यांनी रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या  सिनेमातही आपल्या अभिनयाच्या अनोख्या अंदाजात एका ‘प्रसिद्ध चित्रकाराची’ भूमिका साकारली. पण याही सिनेमात त्यांची भूमिका छोटीच होती. “मराठी चित्रपटामध्ये नसिरुद्दीन यांना मोठ्या भूमिकेत पाहण्याचा योग अजून का आला नाही ?” असा प्रश्न नसिरुद्दीन शाह यांच्या चाहत्यांना नक्की पडला असेल. तर त्याचं कारण नसिरुद्दीन शाह असं सांगतात कि, “मला अस्खलित मराठी बोलता येईपर्यंत मी वाट पाहणार आहे, एकदा का मला आत्मविश्वास आला कि मी उत्कृष्ठ मराठी बोलू शकतो, त्यावेळी मी नक्कीच मराठीत मोठी भूमिका साकारेन.”

नसिरुद्दीन शाह मराठी भाषा शिकण्यासाठी त्यांची पत्नी रत्ना पाठक शाह यांची मदत घेत आहेत.

एक कलाकार म्हणून प्रत्येक अभिनेत्याला विविध भाषांमध्ये, विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करायला नक्कीच आवडते. त्यासाठी ते तेवढीच मेहनतही घ्यायची तयारी हि दाखवत असतात. अभिनेत्यांना वेगवेगळ्या राज्यांमधील सिनेसृष्टींमध्ये काम करताना तिथल्या कामांच्या पद्धतींचा, राज्याच्या संस्कृतीचा तसेच भाषेच्या कमी ज्ञानाचा अडसर हा येतोच. पण गुणी कलाकार या सगळ्यांवर मात करून आपल्या कामाने प्रेक्षकांची मन जिंकतातच. दक्षिणात्य चित्रपटात सयाजी शिंदे, मिलिंद गुणाजी, नागेश भोसले यांसारखे मराठी कलाकार नाव कमावताना आपण पाहतच आहोत. त्याच पद्धतीने नसिरुद्दीन शाह हि आता मराठी सिनेसृष्ठीत आपले पाय रोवू इच्छित आहेत.

नसिरुद्दीन शाह यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराला मराठीत काम करण्याचा मोह होण्यासाठी कारणीभूत आहे ते म्हणजे मराठी सिनेसृष्ठीतील ‘प्रयोगशीलता’. विषय कितीही कठीण वाटत असला तरीही अशा विषयांना अतिशय संवेदनपूर्णरित्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा कसब मराठी दिग्दर्शकांकडे आहे. त्यामुळेच मोठमोठ्या कलाकारांना मराठी चित्रपटाशी जोडले जाण्याची उत्सुकता लागलेली दिसते.

आता नसिरुद्दीन शाह मराठी बोलायला कधी शिकणार ? आणि ते कोणत्या  सिनेमात, कोणती भूमिका साकारणार ?  हे येणारी वेळच सांगेल. पण तोपर्यंत त्यांच्या मराठी शिकण्याच्या जिद्दीला  फिल्मीभोंगाकडून आम्ही शुभेच्छा देतो.

        मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author