नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 

नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण 

कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना चवदार, लज्जतदार खायला आवडते मात्र ते ‘मीडियम स्पाइसी’ असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते का? तसेच नात्यांसह विविध बाबींमध्ये आपण नेहमीच मध्यममार्ग म्हणजेच ‘‘मीडियम’ ला प्राधान्यक्रम देतो का? अशाच आवडी – निवडी आणि सवयी बद्दल खुसखुशीत भाष्य करणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरु होत आहे.

विधि कासलीवाल निर्मित ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. या चित्रपटातील कलाकारांची केमिस्ट्री सुद्धा अतिशय हटके असणार आहे, अभिनेत्री सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि अभिनेता ललित प्रभाकर अशी हटके स्टारकास्ट ‘मीडियम स्पाइसी’ मध्ये आहे. ‘लव्ह सोनिया’, ‘डेट विथ सई’ नंतर सई एका वेगळ्या भूमिकेत दिसेल, ‘आनंदी गोपाळ’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारा ललित शहरी युवकाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. पर्णचाही एक वेगळा अंदाज या चित्रपटात दिसणार आहे.

 

विधि कासलीवाल यांची निर्मिती

विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सने यापूर्वी वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. यामध्ये ‘सांगतो ऐका’, ‘वजनदार’, ‘रिंगण’, ‘गच्ची’, ‘रेडू’, ‘नशीबवान’, ‘पिप्सी’ अशा दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. तर मोहित टाकळकर मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड भाषिक रंगभूमीवरील आघाडीचे नाव आहे, तसेच एक उत्तम संकलक म्हणूनही त्यांना चित्रपटसृष्टीत ओळखले जाते. यामुळे ‘मीडियम स्पाइसी’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. 

‘मीडियम स्पाइसी’ विषयी बोलताना निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, ‘’आम्ही नेहमीच वेगळे विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहोत. ‘मीडियम स्पाइसी’ हा आपल्या आयुष्यातील विविध छटांचे वर्णन करतो. हे सर्व करत असताना, दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी नात्यांचा समतोल जपला आहे. चविष्ट जेवणानंतर आपल्या जिभेवर जी एक खास चव रेंगाळते, तसाच अनुभव ‘मीडियम स्पाइसी’ मधून प्रेक्षकांना मिळेल अशी आशा आहे.’’

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author