विजुअल इफेक्टची जादू ४० फोटोंमध्ये

विजुअल इफेक्ट्स किंवा ज्याला आपण VFX असं म्हणतो त्याने सिनेसृष्टीमध्ये क्रांती घडविली आहे. हॉलीवूडवाले, बॉलीवूडवाले सगळे VFX च्या प्रेमात आहेत. एवढंच काय तर बातम्यांच्या वाहिन्याही आता क्रोमाचा (हिरव्या  किंवा निळ्या कपड्याचा) वापर करू लागले आहेत. १९९० च्या सुमारास  computer generated imaginary (CGI) आलं आणि चित्रपट बनविणाऱ्यांची चंगळच झाली. कारण या technology मुळे कल्पनेतल्या सगळ्या गोष्टी पडद्यावर उतरवता येऊ लागल्या. ते हि कमी खर्चात.

उदाहरण द्यायचं झालंच तर एखाद्या दिग्दर्शकाला असं दाखवायचं असेल कि चित्रपटाचा नायक विमानातून खाली उडी मारतो आणि काही क्षणातच त्या विमानाचा स्फोट होतो. आता हे प्रत्यक्षात करायला गेलं तर यात दुर्घटना होण्याचा संभव आहे.. दृश्य फक्त एकदाच चित्रित केलं जाऊ शकेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते विमान कोट्यावधी रुपयांचं असतं.. त्याचा  स्फोट करायचा म्हणजे ते खर्चिक तर आहेच पण खूप धोकादायक हि आहे.. पण विजुअल इफेक्ट्स ने ते अतिशय नियंत्रित वातावरणात होऊ शकतं. तसेच विमानाचा स्फोट कॉम्पुटरवर तयार करून दाखवला जाऊ शकतो..जे कमी खर्चिक आहे. यात कोणालाही इजा होण्याची भीती फार कमी असते.. कारण नायकाला योग्य ते संरक्षण दिलं गेलेलं असतं. या दृश्याचं चित्रीकरण एखाद्या सुरक्षित आणि नियंत्रित जागेत दिग्दर्शकाला अगदी हवं तसं होऊ शकतं.

पुढच्या चित्रात अक्षय कुमारच्या मागे २ हिरवे पडदे आणि विमानाच्या दरवाजासारखा दिसणारा देखावा ठेवण्यात आलेला आहे… आणि नंतर कॉम्पुटरद्वारे असं दाखविण्यात आलेलं आहे कि त्यांच्या मागे खरंच एक पूर्ण विमान उभं आहे.

अशाच पद्धतीने आपल्या क्रिश या सिनेमाच्या चित्रीकरणात VFX चा वापर केला गेलेला आहे

प्रभास म्हणजेच महेंद्र बाहुबली studio मध्ये बनविण्यात अल्लेल्या एका नकली झाडावरून उडी मारतो आणि चित्रपटात आपल्याला दिसतं कि तो जंगलातून उड्या  मारत मारत पुढे जात आहे.

तसेच Alice in wonderland या चित्रपटात अशा पद्धतीने पात्र तयार केली गेली.

हीच जादू आहे विजुअल इफेक्ट्सची..या जादू सोबतच तुम्हाला सोडून जात आहोत… फोटोंचा आनद घ्या, आवडल्यास नक्की शेयर करा. मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.