पाकिस्तानी युट्युबरने केले ‘होम स्वीट होम’ चे कौतुक

पाकिस्तानी युट्युबरने केले होम स्वीट होमचे कौतुक

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपट आशयघनतेसाठी ओळखले जातात. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित, प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची चर्चा केवळ मराठी भाषिकांमध्ये किंवा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून मराठीसह इतर प्रादेशिक चित्रपटाकडे लक्ष ठेउन असलेल्या विदेशातील सिनेरसिकांमध्येही असल्याचे बघायला मिळते, यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे.

पाकिस्तानस्थित फ़ारुख मुग़ल या यूट्यूबरने आपल्या ‘अॅक्शन रीअॅक्शन’ या यूट्यूब चॅनल वर ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या ट्रेलर बद्दलचा रीअॅक्शन व्हिडिओ शेअर केला आहे. फ़ारुख मुग़लने आपल्या व्हिडिओमध्ये चित्रपटातील कलाकरांचे आणि कवितांचे तोंड भरून कौतुक केले असून चित्रपटातील संगीत, अभिनय आणि वैभव जोशी यांच्या घराची कथा सांगणाऱ्या कविता आवडल्याचेही नमूद केले आहे. तसेच फ़ारुखने सर्वांना ‘होम स्वीट होम’ चित्रपट आवर्जून बघण्याचे आवाहन केले आहे.

 

READ ALSO : दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी ‘होम स्वीट होम’  मधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर चित्रपटाचे निर्माते तर आकाश पेंढारकर, विनोद सातव प्रस्तुतकर्ते आहेत. घर आणि नात्यांच्या नात्यांच्या रिडेव्हल्पमेंटवर अतिशय वेगळ्या अंदाजात ‘होम स्वीट होम’ भाष्य करतो.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author