प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घडण्याची कथा

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घडण्याची कथा

एका रात्रीत कोणालाही यश मिळत नाही. प्रत्येकाची वाट ही संघर्षाने भरलेली असते. दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासाठीसुद्धा सामान्य व्यक्तीपासून प्रसिद्ध दिग्दर्शक बनण्यापर्यंतचा प्रवास संघर्षाने भरलेला होता. त्यांच्या याच प्रवासाचा आढावा घेऊया या ब्लॉगमध्ये.

      रवी जाधव यांचा जन्म २२ सप्टेंबर १९७३ रोजी वरळी, मुंबई येथे झाला. ते वयाच्या अकरा वर्षांपर्यंत वरळी येथे राहिले, त्यानंतर त्यांचं कुटुंब डोंबिवली येथे स्थायिक झालं. रवी जाधव यांनी ‘स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, डोंबिवली’ येथे सातवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं, तर ‘केशव विष्णू पेंढारकर’ या कॉलेजमध्ये त्यांनी बारावीपर्यंत विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलं. रवी जाधव यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. म्हणून त्यांनी घरच्या विरोधाला डावलून ‘जे.जे.स्कूल ऑफ अप्लाईड आर्टला’ १९९१ साली प्रवेश घेतला. तेव्हापासून त्यांच्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 1995 साली रवी जाधव ‘जे.जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टमधून’ पास झाल्यानंतर त्यांनी भारतातील एक नामांकित जाहिरात निर्मिती संस्था ‘ड्राफ्ट FCB अलका ॲडव्हर्टायझिंग’ या कंपनीत काम करायला सुरुवात केली. तिथे तब्बल बारा वर्षे रवी जाधव यांनी काम केलं. यादरम्यान रवी जाधव त्या कंपनीत क्रिएटिव्ह हेड या हुद्यावर पोहोचले. या बारा वर्षाच्या दरम्यान रवी जाधव यांनी कंपनीसाठी बर्‍याचशा जाहिराती बनविल्या, त्यातील अनेक जाहिरातींना विविध पारितोषिकही मिळाली.

2005 च्या दरम्यान झी गौरव पुरस्कारांमध्ये गणपत पाटील यांना झी गौरवचा ‘लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आलं. हा कार्यक्रम पहायला रवी जाधव स्वतः प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. अगदी शेवटच्या दुसऱ्या तिसऱ्या रांगेत बसून त्यांनी हा कार्यक्रम पाहिला. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर रवी जाधव यांच्या मनात एक गोष्ट सुरु झाली, कि “आयुष्यभर ‘नाच्याचं’ काम करणाऱ्या कलाकारावर एखादा चित्रपट बनवला जाऊ शकतो का ?” रवी जाधव या विचारात असतानाच, डॉ. आनंद यादव यांची ‘नटरंग’ हि कादंबरी त्यांच्या वाचनात आली. मग काय ! सुरु झाला एक अविस्मरणीय असा प्रवास.. एका सामान्य माणसाचा एक असामान्य गोष्ट पडद्यावर आणण्यासाठीच्या संघर्षाचा. पण हि गोष्ट करणं रवी जाधव यांच्यासाठी इतकी सहज सोपी न्हवती. कारण हा चित्रपट तयार करायचा असेल तर ज्या नोकरीमध्ये ते स्थिरावले होते, तिला कायमचं सोडून द्याव लागणार होतं. आणि हीच सगळ्यात मोठी समस्या होती. “पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं,” अशा विचारांच्या रवी जाधव यांनी चित्रपट बनविण्याचं पक्क केलं. त्यानंतर त्यांनी घरच्यांना आपल्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. यावेळी घरच्यांनी त्यांना विरोध केला नाही. त्यामुळे रवी जाधव यांनी २००८ साली आपली नोकरी सोडली. आणि त्यांनी नटरंग या चित्रपटाच्या निर्मितीसाठी स्वतःला झोकून दिलं.

निर्मिती प्रक्रिया सुरु झाल्यावर हि रवी जाधव यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. तमाशापटांचा काळ ओसरून २०-२५ वर्ष उलटली होती, आणि आताच्या जमान्यात नटरंगसारखा तमाशापट करणाऱ्या रवी जाधवांना लोक हा चित्रपट न करण्याचे सल्ले देत होते. त्यांना चांगले नट, उत्तम तंत्रज्ञ मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. पण सर्व अडचणींवर मात करून रवी जाधव यांनी ‘नटरंग’ चित्रपट दोन वर्षात पूर्ण केला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बालगंधर्व (२०११), बालक पालक (२०१३), टाईमपास (२०१४) यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपट रवी जाधव यांच्या दिग्दर्शनात बनले आणि त्यांनी मराठी सिनेरसिकांचं भरभरून मनोरंजन केलं.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.