या गुणी कलाकारांनी घेतली अकाली एक्झिट

या गुणी कलाकारांनी घेतली अकाली एक्झिट घेतली

आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला अनेक प्रतिभावान कलाकार लाभले आहेत.यांपैकी काहींनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य केले आहे.पण त्यांची अकाली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.प्रेक्षक अशा कलाकारांची आठवण काढून आजही हळहळ व्यक्त करत असतात.

अशाच अल्पायुषी ठरलेल्या पण आपल्या कलाक्रतीद्वारे अमर झालेल्या काही कलाकारां विषयी जाणून घेऊया.

 

१)  आनंद अभ्यंकर

२०१२ साली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला. वयाच्या ४८ व्या वर्षी आनंद अभ्यंकर यांनी जगाचा निरोप घेतला. आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. ‘या गोजीरवाण्या घरात’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते.

 

२) अक्षय पेंडसे

२०१२ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आनंद अभ्यंकर यांच्यासोबतच्या अपघातात अभिनेता अक्षय पेंडसेचा देखील मृत्यू झाला. निधनावेळी अक्षयचे वय फक्त ३३ वर्षे इतके होते. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावाजवळ अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युषचाही मृत्यू झाला. एका कार्यक्रमाचे चित्रीकरण संपवून अक्षय पेंडसे आनंद अभ्यंकर यांच्यासोबत पुण्याहून मुंबईकडे निघाले होते. अक्षय पेंडसेने प्रायोगिक रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केले होते. माझ्या वाटणीचे खरेखुरे, सिगारेट्स ही प्रायोगिक नाटके, ‘मिस्टर नामदेव म्हणे’ हे व्यावसायिक नाटक आणि ‘उत्तरायण’ चित्रपटातील त्याच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या होत्या.

 

३)  भक्ती बर्वे – इनामदार

हिंदी-मराठी सिनेमांत आणि मराठी-गुजराती नाटकांत काम करणा-या प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे इनामदार यांचे मोटार अपघातात वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. १२ फेब्रुवारी २००१ रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती.

 

४)  अतुल अभ्यंकर

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ या मालिकेतील हेगडी प्रधानांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे 12 नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे तीन वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.

 

५)  काशीनाथ घाणेकर

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते काशीनाथ घाणेकर यांचे अति मद्यसेवनाने अकाली निधन झाले. 2 मार्च 1986 रोजी वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी कायमचा या जगाचा निरोप घेतला होता.

 

६)  अरुण सरनाईक

एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवलेले अभिनेते अरुण सरनाईक यांचे १९८४ मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात निधन झाले होते. मृत्यूसमयी ते  केवळ ४९ वर्षांचे होते.

 

७)  स्मिता पाटील

हिंदी-मराठी सिनेसृष्टीत कलात्मक सिनेमांचा विषय निघाल्यानंतर स्मिता पाटील या अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम होतो. स्मिता पाटील यांचे फिल्मी करिअर खूप छोटे होते. मात्र या काळात त्यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले. १७ ऑक्टोबर १९५५ रोजी जन्मलेल्या स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. १३ डिसेंबर १९८६ रोजी बाळंतपणात त्यांचे निधन झाले होते.

 

८)  लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे यांना ‘लक्ष्या’ आणि ‘हास्यसम्राट’या नावांनीही ओळखले जाते.मूत्रपिंडाच्या विकाराने वयाच्या ५० व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. असे म्हटले जाते, की अतिमद्यपानामुळे त्यांना मुत्रपिंडाचा आजार जडला होता. १६ डिसेंबर २००४  रोजी या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे, मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली होती. ‘टुरटुर’ हे त्यांचे पहिलेच नाटक जबरदस्त हिट ठरले होते. त्यानंतर आलेले ‘शांतेचे कार्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे द्वार’, ‘शांतेच कोर्ट चालू आहे’ ही नाटकेही यशस्वी ठरली. लक्ष्मीकांत यांनी १९८५ मध्ये ‘लेक चालली सासरला’ या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांचे आलेले धुमधडाका, अशी ही बनवाबनवी , थरथराटसह अनेक सिनेमे प्रचंड लोकप्रिय ठरले.

अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे लक्ष्मीकांत यांचे ट्युनिंग कमालीचे होते. सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाद्वारे त्यांनी १९८९ मध्ये हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन , बेटा आणि हम आपके है कौन, हे हिंदी सिनेमे खूप गाजले.

 

९) शांता जोग

मराठी चित्रपट आणि नाट्य‍अभिनेत्री. वयाच्या ५५व्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर नाटकाच्या बस‍ला आग लागल्यामुळे यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.