प्रेमाच्या त्रिकोणात कोण होईल फ्रेंडझोन्ड…? ‘ती आणि ती’ च पोस्टर पाहून अंदाज तर लावा..!!

प्रेमाच्या त्रिकोणात कोण होईल फ्रेंडझोन्ड…? ‘ती आणि ती’ च पोस्टर पाहून अंदाज तर लावा..!!

 

प्रेमाचा त्रिकोण हे एक मोठं कोडं असतं. एकाच व्यक्तीवर दोघांच प्रेम…!! पूर्वी पासून चालत आलेला तिढा… एक राजकन्येसाठी पूर्वी दोन राजकुमारी युद्ध व्हायची. आता एकाच मुलाच्या प्रेमात दोन युवतींमध्ये कॅट फाईट होते नाही का…? २०१२ मध्ये सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटीं चा आलेला कॉकटेल सिनेमा आठवतोय का…?? एक बोल्ड आणि डॅशिंग तर एक एकदम काकू बाई… अशा दोन मैत्रिणीमध्ये शेवटी हिरो काकुबाईलाच निवडतो. पण ह्यात मात्र कॅट फाईट नव्हती. बोल्ड स्वभावाची दीपिका शेवटी माघार घेते आणि मैत्रिणीला शुभेच्छा देते. असाच काहीसा लव्ह ट्रायंगल असावा असे तरी पोस्टर वरून वाटते… कोणते पोस्टर म्हणता…?? अहो पुष्कर जोग, प्रार्थना बेहेरे आणि सोनाली कुलकर्णी (द्वितीय) ह्यांचे ‘ती आणि ती’ च पोस्टर हो…!! त्यात पुष्कर जोग फक्त अभिनेताच नाही तर प्रोड्युसर देखील आहे. 

मृणाल कुलकर्णी ही स्वतः एक अभिनेत्री आहे आणि बरेच सिनेमांची दिग्दर्शिकाही आहे. सौंदर्यवती आणि अभिनयसंपन्न अशा मृणाल कुलकर्णीने ह्या ‘ती आणि ती’ चे दिग्दर्शन केले आहे. तिचे आधीचे ही सगळे सिनेमे अतिशय हटके होते. त्यामुळे ह्या सिनेमाची उत्सुकता नक्की वाढलेली आहे. ह्या सिनेमाच्या पोस्टर मध्ये बकड्रॉप ला लंडन टॉवर दिसत आहे. सिनेमाच्या चमुच्या म्हणण्याप्रमाणे ह्याचे सगळे शूटिंग लंडनलाच झाले आहे. त्यामुळे तीन तरुण मित्र आणि मैत्रिणींच्या मैत्री आणि प्रेमाच्या त्रिकोणासोबत लंडनची सुंदर दृश्ये ही दिसणार हे नक्की. हा एक धमाल विनोदी आणि प्रेम त्रिकोणाचा सिनेमा असेल असे पोस्टर वरून वाटते. 

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

प्रार्थना बेहेरे जरा शांत स्वभावाची तर सोनाली कुलकर्णी जरा चुलबुली आणि मजेशीर आहे असा तर्क आपण लावू शकतो. पुष्कर जोग हया पूर्वी ट्रॅव्हलिंग म्हणजेच देशविदेशाच्या सफारींच्या महितीपटात काम करत असलेले आपण पाहिले आहे. रिऍलिटी डान्स शो आणि हिंदी मराठी सीरिअल्स च्या माध्यमातून सुद्धा त्याने नाव कमावले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या मराठी बिग बॉस मुले तर पुष्कर जोग घरोघरी जाऊन पोहोचलाच आहे. त्यामुळे त्याच्या ह्या प्रसिद्धीचा फायदा त्याला सिनेमातही होईल. हयातले हे तीनही कलाकार आपापल्या वेगवेगळ्या चित्रपटांमुळे किंवा इतर कामामुळे खूपच प्रसिद्ध आहेत. ह्या दोघी अभिनेत्रींनी तर मराठी चित्रपटसृष्ठीत आपले बस्थान कधीच बसवले आहे. आता ह्या तिघांची केमिस्ट्री कशी असेल ह्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यातून मृणाल कुलकर्णीने दिग्दर्शन म्हणजे भन्नाट सिनेमा…!! प्रेमाचा गोंधळ, आणि शेवटी कोणाच्या प्रेमाचा विजय होईल हे तर चित्रपट आल्यावरच कळेल. ह्यातील प्रेमाच्या त्रिकोणात कोण फ्रेंडझोन्ड होईल? किंवा कोणाचे प्रेम शहीद होईल हे बघायला मात्र औत्सुक्याचे ठरेल…!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author