तो येतोय, ती आणि ती दोघींना घेऊन.

तो येतोय, ती आणि ती दोघींना घेऊन.

तो म्हणजे एक हँडसम तरुण, नुसतं बघितल्यावर कुणीही प्रेमात पडेल असा. खूप दिवसांनी दिसला, मग कोण सोडणार त्याला? म्हणजे…. विचारपूस केल्याशिवाय? खूप दिवसांनी दिसलास, काय करतोस सध्या, कुठे असतोस? वगैरे, वगैरे. मग तो केसांवरून जरा हात फिरवून ठाक ठीक असल्याची खात्री करतो, कारण समोर असते एक सुंदर, तरुण, दिलाची धडकन वाढवणारी जणू अप्सराच.

अशी अप्सरा भेटत गेली आणि जर तिच्याकडून मिळाला हिरवा कंदील तर कितीही सरळ असलेला, नाकासमोर पाहून चालणारा तरुण जरा विचलित होणारच की? काय? तुम्हाला काय वाटतंय?. अहो साक्षात अप्सरा समोर हिरवा कंदील दाखवत उभी आहे, क्षणभर सगळ्या जगाचाच विसर पडणार की. म्हणजे अगदी आपलं स्वतःचं लग्न झालं आहे, आपल्याला सुद्धा एक अशीच सुंदर बायको आहे ह्याचाही विसर पडणार की. कारण सूर्याच्या तेजापुढे चंद्राचा प्रकाश जसा फिका पडतो तशीच परिस्थिती होणार ना? पटतंय का? पण मित्रांनो ही फक्त एक कल्पना आहे असं समजा. कारण आपल्याला प्रत्यक्षात असा अनुभव नाही येत. आणि चुकून माकून आलाच अनुभव तर ते स्वप्न होतं असं समजून विसरून जा. कारण ही भानगड ठरू शकते, आणि चांगले तरुण भानगडीत नाही पडत.

 

READ ALSO :  सर्व लाईन्स व्यस्त आहेत पण फोन च्या का हृदयाच्या..? कळेल लवकरच

‘मृणाल कुलकर्णी’ हे नाव तुम्हाला माहीत नसेल असं नाही होणार कारण बऱ्याच चित्रपटातून आपण मृणाल कुलकर्णीच्या उत्कृष्ट भूमिका बघितल्या आहेत. एक अभिनयाची जाण असलेली मराठी अभिनेत्री, जिचा अभिनय सगळ्या मराठी सिने रसिकांना आवडला तीच अभिनेत्री आपल्या कलागुणांचा दुसरा पैलू एका नवीन चित्रपटातून सिने रसिकांना दाखवणार आहे, तो म्हणजे दिग्दर्शनाचा . लवकरच येणार आहे एक भन्नाट रोम-कॉम चित्रपट. ज्याचं नाव आहे “ती आणि ती”. हा अफलातून रोमान्स आणि कॉमेडी असलेला चित्रपट दिग्दर्शित केला आहे अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने. आणि ह्या खास तरुणांसाठी असलेल्या चित्रपटाची पटकथा आहे नवा कोरा तरुण पटकथा लेखक विराजस कुलकर्णी याची. हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे. त्यामुळे ही पटकथा सुद्धा भन्नाट आहे. आणि ह्या चित्रपटाचा हीरो आहे चिकणा “पुष्कर जोग” आणि ती आणि ती आहेत ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी आणि ‘सुंदरा’ प्रार्थना बेहेरे. त्यामुळे खरी रंगत येणार ह्या चित्रपटाचा ढंग अनुभवताना. कारण ह्या रंगतदार मराठी चित्रपटाचे ८०% शूटिंग लंडनला झाले आहे. म्हणजे तर आणखीनच मसालेदार झाला असणार हा रोम-कॉम चित्रपट. “ती आणि ती” असं नाव आहे ह्या चित्रपटचं, म्हणजे हा हिरो ती ‘किंवा’ ती असं नाही म्हणत. तर त्याला हव्यात ती ‘आणि’ ती.. म्हणजे दोघी ही..!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author