पुन्हा एकदा खजिन्याच्या शोधवर ‘धमाल’ गँग.. नवीन विनोदवीरांसह जंगलात होणार टोटल धमाल..!!

पुन्हा एकदा खजिन्याच्या शोधवर ‘धमाल’ गँग.. नवीन विनोदवीरांसह जंगलात होणार टोटल धमाल..!!

२००७ साली आला होता एक चित्रपट, त्याचं नाव होतं “धमाल”. नंतर आला त्याचा सिक्वल त्याचं नाव ठेवलं होतं “डबल धमाल”. आता पुन्हा तीच स्टोरी पण ऍक्टर्स वेगळे. त्याचं नाव आहे “टोटल धमाल “धमालीची हॅट्रिक,
फुल टू टाइम पास. पण कॉमेडी झाल्यावर हसावं, तर लगेच एखाद्या डेंजर प्रसंगातून जायला लागतं, जरा कुठं श्वास घेतो न घेतो तोच समोरून चालून येतो भयानक जंगली प्राणी. त्यातून कशीतरी सुटका करून पुढं बघावं तर मोठ्या खड्ड्यात पाय. तोंडावर पडल्यावर चूक लक्षात येते. अशी सगळी उठापटक. पण कशासाठी?

एका ५० करोड च्या खजिन्या साठी, त्या खजिन्यात आहे ही ५० करोडची बॅग. आणि ती मिळवायची म्हणून सहा सात जोड्या म्हणजे एकापेक्षा एक अफलातून नमुने . जो आधी पोचणार त्याला सगळा माल मिळणार. ह्या ५० करोडची माहिती एक चोर शेवटची घटका मोजताना देतो. आणि सुरू होते ही लवकर पोचायची धावपळ. कोण जातं विमानातून , कोण हेलिकॉप्टरने, कोण जंगलातून शॉर्ट कट ने, तर कोण पाण्यातून. सगळ्यांच्या आधी पोचायचं , म्हणजे त्याला आलं टाइम चं लिमिट. आणि सगळ्यांनाच आशा की आपल्यालाच मिळणार ५० करोड. मला मिळाले तर त्या हारामखोराला एक कवडी देणार नाही , स्वप्न ही रंगवली की समाधान मिळतं. मग सगळेच रंगवतात स्वप्न. आणि सगळ्यात आधी पोचायचं प्लॅनिंग होतं.

 

READ ALSO :  सर्व लाईन्स व्यस्त आहेत पण फोन च्या का हृदयाच्या..? कळेल लवकरच

पहिल्या “धमाल” मध्ये होते संजय दत्त, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख. आणि आता ह्या “टोटल धम्माल” मध्ये आहेत , अजय देवगण, अर्षद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख, अनिल कपूर, जॉनी लिव्हर, आणि सिने रसिकांच्या दिलाची धडकन माधुरी दीक्षित.
आणि असंख्य जंगली जनावरं. आता ही जंगली जनावरं कशाला? टोटल धमाल करायला. एवढे सगळे धमाल करणारे ऍक्टर्स असून सुद्धा हो जंगली जनावरं काय काय टेन्शन देतात, ती पण आजपर्यंत कधीही न अनुभवलेली मजा आहे. वाघाला दम देणारा गुजराथी आहे, तर ऑटो चं हेलिकॉप्टर बनवणारा जॉनी लिव्हर काय धमाल करणार हे थिएटर मध्ये बसून हसत हसत थोडं टेन्शन घेऊन एन्जॉय करायला मजा येणार आहे. ५० करोड चा मालक कोण होणार हे पण कळायला पाहिजे ना? मग खास वेळ काढून ही धमाल पाहायलाच पाहिजे की. हे सगळे एकापेक्षा एक अफलातून ऍक्टर्स, त्यांचे कॉमेडीयुक्त गंभीर डायलॉगस, म्हणजे टोटल धमाल कारण टोटल मारली की त्यात काही बाकीच राहत नाही, सगळ्यात शेवटी मारतो आपण टोटल. म्हणजेच धमालीचा अर्क काढून दिलाय, टेस्ट करायला. बघू आता नुसती टेस्ट घेताय का पार चाटून पुसून तृप्त होऊन ढेकर देताय.

खरं तर ह्या धमाल मध्ये माधुरी दीक्षित आणि ईशा गुप्ता ह्या दोघींना घेतलंय, पण त्यांना काही कामच दिलेलं नाही. त्यांच्या पेक्षा जास्त काम त्या जंगली जनावरांना दिलं आहे. मग ह्या नावाजलेल्या, कसलेल्या, माधुरी दिक्षितला ह्या सिनेमात घेतलं कशाला हा प्रश्न उभा राहतो. पण माधुरी दीक्षित मुळे चित्रपटाला चांगलं डिमांड येईल. कारण माधुरी दिक्षितनी जेंव्हा पुन्हा सिने सृष्टीत पदार्पण केलं तेंव्हा ह्या सिने सृष्टीतल्या लोकांनी मंदिरात जाऊन तिच्या कम बॅक साठी नारळ फोडले होते. आणि सिने सृष्टीत एक प्रकारची ‘हलचल’ मच गायी थी। आजही माधुरीची क्रेझ आहे, हे त्यातून सिद्धच झालं होतं. ‘नही माधुरी तो फिल्म अधुरी’.
म्हणून माधुरीला ह्या चित्रपटात विशेष काम नसताना सुद्धा तिच्या नावामुळे घेतलं असावं. असा एक पॉझिटिव्ह विचार सिने रसिक करतील अशी आशा करूया.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author