ट्रकभर स्वप्नं” २४ ऑगस्टला पडद्यावर झळकणार

ट्रकभर स्वप्नं२४ ऑगस्टला पडद्यावर झळकणार

प्रत्येक माणूस उरात अनेक स्वप्नं बाळगून असतो. पण त्यातील काही स्वप्नं खास असतात. जसं कि आपलं ‘स्वतःच घर’. प्रत्येकालाच वाटत असतं कि आपलं छोटंसं का होईना पण स्वतःच्या हक्काचं एक घर असावं. ज्यात आपल्या मायेच्या माणसांनी एकत्र आनंदाने राहावं. पण सगळ्याचंच हे स्वप्नं पूर्ण होतंच असं नाही, आयुष्यभर मेहनत घेऊनही काही लोकांचं त्यांच्या ‘घराचं स्वप्नं’ हे अखेरपर्यंत स्वप्नंच बनून राहतं. असंच आपल्या स्वप्नातलं घर मिळवण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाला करावी लागणारी धडपड ‘ ट्रकभर स्वप्नं ‘ या सिनेमातून आपणाला पहायला मिळणार आहे. हा चित्रपट २४ ऑगस्ट २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

“’ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटाची कथा सर्वसामान्य माणसांची आहे, आपल्याला जगण्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल,” असा विश्वास दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांची मनं मोहून टाकतील अशी चार गाणी आहेत, ती हि वेगवेगळ्या धाटणीची. श्रेयस आंगणे यांच्या लेखणीतून साकारलेल्या त्यांच्या गीतांना, त्यांनी स्वतःच  संगीतबद्ध केलेले आहे. ‘लुकलुकले स्वप्न’ हे प्रेमगीत, ‘सेल्फीवाली’ हे आयटम सॉंग, मुंबईच्या जीवनावर भाष्य करणारे ‘धडक धडक’ हे गाणं आणि ‘देवा तुझ्या’ हे भक्तीगीत यांचा सुरेख नजराणा या चित्रपटात आहे. तर सोनू निगम, आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील या सुरांच्या जादूगारांनी ही गीते गायली आहेत.

मीना चंद्रकांत देसाई व नयना देसाई निर्मित ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी,मनोज जोशी, स्मिता तांबे, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. तर  ‘लय भारी’ या मराठी चित्रपटानंतर दक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर तब्बल चार वर्षांनी अभिनेत्री अदिती पोहनकर ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहले असून, छायांकन केलंय राजीव जैन यांनी, तर संकलनाची जबाबदारी पार पाडलीय प्रशांत खेडेकर यांनी. कलादिग्दर्शन हेमंत भाटकर,  नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे, वेशभूषा पूर्णिमा ओक आणि रंगभूषा सुहास गवते यांची आहे.

       आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करताना एका सामान्य कुटुंबाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो..? ते यातून कशा प्रकारे मार्ग काढतात ? घरातील सर्वच सदस्यांच्या स्वप्नातील घर सारखेच आहे की वेगवेगळे ?  आणि शेवटी या कुटुंबाची धडपड यशस्वी होते की नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला २४ ऑगस्ट ची वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती-जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author