“तू तिथे असावे..”

“तू तिथे असावे..”

 
मराठी माणूस.. हो मी आहे मराठी माणूस.. मी बघतो स्वप्न.. खूप मोठी मोठी स्वप्न.. जगावेगळी स्वप्न.. मराठी पानाच्या वर्तुळाला बाहेरील स्वप्न आणि त्याचं काय करतो..? कागदाच्या पुडीत बांधून विकतो..! 
sssनाही हो.. असं कसं करेन..? तुम्ही काय करता तुमच्या स्वप्नांचं..? रोज बघता ना.?? कधी ब्लॅक अँड व्हाइट कधी रंगीत.. 
 
पण माहितीये का..? मराठी माणसाने स्वप्न पाहूच नयेत असे म्हणतात.. पाहिली तर फार मनाला लावून घेऊ नये ही म्हणतात.. मनाला लावलीच तरी जास्ती अपेक्षा ठेवू नये देखील म्हणतात.. का..? अहो मराठी माणूस आपण.. आपण मध्यमवर्गीय म्हणून जन्माला येणार, चार चौघांसारखं काम करून पोट भरणार आणि मध्यमवर्गीय म्हणून स्वर्गात जाणार.. नाही का..?
 
आता बघा ना आमच्या ‘तू तिथे असावे’ ह्या चित्रपटाच्या हिरोला रॉक स्टार व्हायचंय.. कसं शक्य आहे ते..? मराठी ना रे तू..!! त्यातून अगदीच गरीब घरचा.. असली दिवा स्वप्न कशाला बघतोस गड्या..?! आणि मराठी माणूस रॉक स्टार म्हणून शोभेल तरी का? हे काय भलतंच..?
आपल्याकडे कसं असतं? एक कोणती तरी पदवी घ्यायची आणि सरळधोपट मार्गाने नोकरी करायची असंच ‘अलाऊड’ आहे. फार तर एखादा छोटा मोठा धंदा काढण्याची परवानगी मिळू शकते. एखादं एल आय सी एजंट वगैरे होण्याची नामी संधी पण मिळते कधी कधी नशिबात असेल तर. 
 
 

READ ALSO : जाणून घ्या किती मानधन घेतात हे नामवंत मराठी अभिनेते आणि अभिनेत्री?

आणि हो नुसता छान गातोस इथवर ठीक आहे. पण बाबांना सांगितलंयस का.? एकदा तुझ्या बाबांना तर सांगून बघ की तुला ऑर्केस्ट्रा, रॉक बँड वगैरे मध्ये गायक व्हायचंय..! बाबांची चार अनुभवाची वाक्ये तुला झक मारत नोकरी धंदा शोधायला भाग पाडतील रे दादा.. जाऊदे ना तू. काय लावलंयस कधीच ‘तू तिथे असावे’ अन मग सगळे ठीक व्हावे..??! असं काहीही नसतं हो..! तुझी मैत्रिण पण तुला उडवा उडवीची उत्तरंच देतीये बघ. ती कशाला तिथे असतीये लेका..!
 
बरं बरं राहिलं. आता नाही तुला सल्ले देणार. तू ऐकायचंच नाही ठरवल्यावर आम्ही तरी काय करणार..? जा मग झिजव उंबरठे काम देणाऱ्यांचे. बघ कुठे कुठे आणि कसे गायला लावतील. निराशा पदरी पडेल. पण कर अजून प्रयत्न. कदाचित मोठी म्युझिक कंपनी तुला उचलेल. पण फसू नकोस बाबा. मोठ्या वाटणाऱ्या फसव्या कंपन्या पण असतील हो. तुला काम देण्याच्या बदल्यात तुझ्याकडूनच पैसे उकळतील. काही सांगता येत नाही हल्ली. हल्लीच काय हे तर कित्येक वर्षांपासून चालुये खरं तर. आणि नेमके आपणच, मराठी माणूसच बळी पडतो रे अशा प्रलोभनांना. 
 
असो बघ आता कसं काय जमतंय ते. वय ही वाढतंय तुझं. दिसतंय ते चेहऱ्यावर. अख्या ट्रेलर भर सतत आशावादी माणूस वाटतोयस तर खरा. स्वप्न बघ रे, पण ती सत्यात उतरण्यासाठी काही कारणारेस का फक्त बोल बच्चन? हिरोईन बाकी छान शोधलीयेस हो. जेव्हा तू मोठा गायक होशील आणि ‘ती तिथे असेल’ म्हणजे मिळवलं..! नाही, काय आहे ना एक तर मराठी, त्यातून मध्यमवर्गीय म्हणजे जरा अवघडच. बघुयात काय काय होतंय ते. शुक्रवारी कळेलंच.. तीच घिसीपीटी की काही ताजी फ्रेश..!  
 
चला.. तूर्तास तुला आणि तुझ्या टीम ला शुभेच्छा..!! 
‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author