हाक देता तुला साद जाते मला

तुला पाहते रे , भारावून टाकणारे शीर्षक गीत , सुबोधची रुबाबदार अदा, त्यातील इशा अगदी सालस, लोभस, भोळी, निर्मळ, साधी, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानणारी. या सर्व गोष्टी पाहता दोन व्यक्तिरेखा अगदी परस्पर विरोधी तरीही कुठेतरी त्यांचे बंध जुळलेले. टेलिव्हिजन क्षेत्रात प्रेम कथा परंतु एका वेगळ्या धाटणीची म्हणजे सुबोध भावे नेहमी वेगळ्या व्यक्तिरेखा आणि भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे असे म्हणण्यापेक्षा तो ओळखला जातो. एक उत्तम अभिनेता, पारंगत दिग्दर्शक, लेखक, अशा विविधांगी भूमिका त्याने अगदी उत्तमरीत्या पार पडल्या आहे. २०१८ मध्ये सुबोध बराच चर्चेत आहे कारण त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेमुळे प्रत्येक चित्रपटात एक वेगळी भूमिका त्याने साकारली आहे. एकाच धाटणीच्या भूमिका न साकारता सुबोध त्याच्या कलागुणांना ज्या भूमिकेमुळे कस लागेल अशीच भूमिका साकारतो असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. कट्यार काळजात घुसली यातील सदाशिवची भूमिका त्याने उत्तमरीत्या साकारली आहे, सदाशिवची भूमिका साकारताना तो एक उत्तम गायक आहे याची जाणीव ठेवून त्याने ती व्यक्तिरेखा साकारली आहे. सदाशिव साकारताना त्याने दिग्दर्शकाची भूमिका हि अगदी उत्तमरीत्या पार पडली होती.

सुबोधने आजवर चरित्रपटात व्यक्तिरेखा साकारल्या आहे, त्यापैकी लोकमान्यटिळक, बालगंधर्व या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केल्या आहे.

छोट्या पडद्यावर सुबोध पुनरागमन केले आहे, तुला पाहते रे या मालिकेद्वारे त्यातील त्याची भूमिका सुद्धा त्याच्या  त्याची भूमिका ही एका प्रसिद्ध , धनाढ्य उद्योगपतींची आहे .  खूप धनाढ्य असूनही तो अविवाहित आहे. जवळपास दोन वर्षानंतर म्हणजे ‘का रे दुरावा ‘ नंतर तो आता परत छोट्या पडद्यावर अभिनय करत आहे.

येत्या ३१ ऑगस्टला त्याचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होत आहे सविता दामोदर परांजपे , सविता दामोदर परांजपे हा चित्रपट १९८० च्या दशकात गाजलेल्या नाटकावर आधारित आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका काय असेल आणि कशी असेल आपल्याला ते चित्रपट बघितल्यावर कळणार आहे.

सुबोध अजून एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहे येत्या दिवाळीत तो चित्रपट आणि डॉ काशिनाथ घाणेकर .

सुबोध तुला पाहते रे …

मराठी फिल्मीभोंगा कडून तुला ‘ सविता दामोदर परांजपे ‘ या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author