तुंबाड बघून दांडी गुल झाली? आता येतोय तुंबाड भाग दुसरा.. डरते रहो..!!

तुंबाड बघून दांडी गुल झाली? आता येतोय तुंबाड भाग दुसरा.. डरते रहो..!!

 

काळोख, किर्रर्र आवाज, कंदलातील दिव्याचा तो मिणमिणता प्रकाश आणि समोर उलगडणारं भयाण रहस्य.. एरवी साधे भासणारे ते चेहरे अचानक अक्राळविक्राळ वाटतात. थेटरच्या डॉल्बी साऊंड मधून अचानक चित्कार, फुत्कार आणि कर्कश्य आरोळ्या येतात.  पण घाबरगुंडी उडालेली असताना देखील हातांच्या बोटांचे तोंडावर आवरण घेऊन त्याच्या फटीतून आपण पुढे काय होतंय हे पाहायला उत्सुक असतो. विचित्र आवाजांची भीती वाटतेच पण कधी कधी शांततेची भीती पण वाटते. कधी कधी ती शांतता वादळापूर्वीची सुद्धा असू शकते. काळोख हा भीतीचा हुकमी एक्का.. असे भयपट आपली एकेक पाने उघडत जातात आणि आपण अनुभवतो तो थरार.. अंगावर काटा आणणारा थरार..

असा भीतीच्या पत्त्यांचा बंगला समोर असेल तर तो मनातील हिम्मतीच्या फुंकरेवर पाडावा.. तो पडतोय ना पडतोय तोवर दुसरा भीतीचा टोलेजंग अक्राळविक्राळ टॉवर उभा राहावा. अशीच काहीशी अवस्था होणारे भयपट रसिकांची.  तुंबाड हा मराठी अभिनेत्याचा हिंदी चित्रपट आपला दुसरा भाऊ घेऊन येतोय ‘तुंबाड भाग दोन’. आता हा धाकटा भाऊ दादा पेक्षा सरस ठरणार हे नक्की. तुंबाड च्या पहिल्या भागाचे अपेक्षेपेक्षा जास्ती कौतुक झाले. आणि ते त्या कौतुकास पात्र होतेच. फक्त महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्रा बाहेर जिथे जिथे हा सिनेमा झळकला होता तिथे तिथे त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. ‘भयंकर भीती वाटली पण चित्रपट आवडला’, ‘बहुहू खूप घाबवलं सिनेमाने’, ‘काहीतरी वेगळं आहे, बघून याच सगळे’ आशा प्रकारे त्या सिनेमाला कौतुकाची थाप मिळत राहिली.

 
 

READ ALSO :  रोहित शेट्टीचे मराठी ढंगाचे सिनेमे बंद होणार.!! कारण सिंघमची जागा घेतली दुसऱ्या हिरो ने..

लोकांना तुंबाड इतका आवडला की त्याचा दुसरा भाग येवो अशी सगळ्यांनीच इच्छा व्यक्त केली. कधी कधी एखादी इच्छा पूर्ण होते त्याच प्रमाणे तुंबाडच्या चमूने त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करायचे ठरवले आणि तुंबाडचा भाग दोन आणतोय अशी घोषणा केली. आता हा दुसरा भाग पाहिल्याचा सिक्वेल नसेल असे म्हंटले जातेय. पण तरीही पाहिल्याचा धागा पकडूनच पुढे जाऊ असे तुंबाडच्या चमूचे म्हणणे आहे. म्हणजे पुरतं घाबरवून सोडणार तर सगळ्या चाहत्यांना. अजून एक रोमांच उभा करणारा अनुभव घ्यायला तयार व्हा रसिक हो..!! भयपट बघण्याची हिम्मत आणि आवड असणाऱ्यांना ही एक पर्वणीच ठरेल हे नक्की आणि कसं असतं ना..!! पहिल्या भावाने काम उत्कृष्ट करून ठेवल्याने त्याचे ‘गुड विल’ धाकट्या भावाला मिळणार हे ओघाने आलंच. आता बॉल धाकट्या भावाच्या कोर्टात आहे.. त्यामुळे रसिकांच्या उंचावलेल्या अपेक्षांना तुंबाड भाग दोन कसे पूर्ण करेल हे बघण्यास खूप मज्जा येणार हे मात्र खरं..!!

तुंबाड भाग दोन लवकरच येऊन थेटरचा लांडगा होऊदेत अशी फिल्मीभोंगा तर्फे शुभेच्छा पूर्ण ‘टीम तुंबाडला’..!!

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author