हटके विषयावर लवकरच येत आहे नवीन चित्रपट सूर सपाटा

हटके विषयावर लवकरच येत आहे नवीन चित्रपट सूर सपाटा आणि त्याचे पोस्टरच झिंग आणते आहे..

कबड्डी कबड्डी कबड्डी.. म्हणत आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर लोळवत आपल्या संघासाठी मांडीवर थाप देऊन गुण आणणे म्हणजे एक मोठी बाजीच मारणे जणू.. कबड्डीचे ते आखलेले मैदान, दोन संघ, अरे घे, अरे ओढ, अरे उचल असे मैदानावरचे चित्कार.. हा मातीतला खेळ एक वेगळीच झिंग आणतो नाही..? आता तुम्हाला वाटेलसूरसपाटा नावाच्या सिनेमाचा आणि ह्या खेळाचा काय संबंध..? अहो ह्याचाच तर संबंध आहे.. हासूरसा रे चा सूर नसून चार सहा खेळाडूंनी घेराव घातल्यावर त्यातूनसूरमारून मधली रेखा पार करण्याचा आहे. म्हणजे कबड्डी खेळात एन्ट्री टाकणाऱ्याला जर घेरले गेले तर तो वाचण्यासाठी जो सूर मारेल आणि त्याचा सपाटाच लावेल त्या बद्दल आहे हो हा चित्रपट..

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

नावावरून गाण्याचे सूर, ताल वाटेल आणि गोंधळ उडाला असेल तर ह्याचे खेळाचीझिंगदेणारे पोस्टर एकदा पाहून घ्या. मस्त संघाचा गणवेश घातलेली चुणचुणीत मुलं म्हणजेच कबड्डीचे खेळाडू त्या पोस्टरवर चमकले आहेत. मैदानी खेळ म्हटले की त्या चित्रपटाला हमखास यश हे जणू गणितच आहे. आणि महाराष्ट्राचा आवडता खेळ हुतुतू म्हणजेच जागतिक भाषेत ज्याला कबड्डी म्हटले जाते त्या खेळावर काढलेला सिनेमा महाराष्ट्रात जोरदार चालेल ह्यात शंका नाही. सध्या तसेही प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी ह्या खेळाला सुगीचे दिवस आलेच आहेत. आणि सैराट, फँड्री प्रमाणे ह्याही विणेमाची कथा महाराष्ट्रातल्या एक खेडेगावपासूनच होते. आता गाव, गावातली माणसं, तिथले लोकेशन हा सगळ्या प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातून आपल्या मातीतला कबड्डीचा खेळ म्हणजे भट्टी मस्त जमणारच..!!

कंठाळे आणि लाडे ह्यांच्या प्रोडक्शन चा हा सिनेमा मार्च २०१९ ला प्रदर्शनास तयार होईल. छोट्या खेडेगावातल्या कबड्डी पटूंचा गाव ते शहर असा खेळाचा प्रवास चित्रपटकडून अपेक्षित आहेह्या मध्ये नवोदित कलाकारांसोबत उपेंद्र लिमये, गोविंद नामदेव, प्रवीण तरडे, आनंद इंगळे, भारत गणेशपुरे असे दिग्गज कलाकारही आपल्याला बघायला मिळणार आहेत. लगान, चक दे इंडिया, दंगल असे खेळांवर आधारित असणारे सिनेमे हिंदी मध्ये सुपरहिट झालेले आपण पहिलेच आहेत. त्याच प्रमाणे आता मराठीतही सूर सपाटा सारखे खेळांवर बेतलेले काही ब्लॉकबस्टर आपल्याला आगामी काळात पाहायला मिळणार म्हणजे क्रीडाप्रेमींना पर्वणीच..!! 

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author