‘उन उन’ गाण्यातून दिसली ओम – मालविका यांची केमिस्ट्री

‘उन उन’ गाण्यातून दिसली ओम – मालविका यांची केमिस्ट्री

मुळशी पॅटर्न’ चे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

सुर्रर्र के पियो… चहा हे सर्वांच्या आवडीचं पेय. सकाळचा चहा नाही घेतला तर काहीना दिवसाची सुरुवात झाली असे वाटतच नाही. काहींसाठी हा स्फूर्ती देणारा महत्वाचा घटक आहे तर काहींसाठी हा जगण्यातील अविभाज्य घटक आहे. चहाचं आपल्या आयुष्यात एक आगळे वेगळे असं स्थान आहे. चहा पिण्यासाठी काही ठराविक वेळ नसते मात्र वेळेला चहा हवाच. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात चहा स्फूर्ती देण्याचे काम करतो. आजवर आपण प्रेमसंबंधातील अनेक गाणी ऐकली आहेत पण चहा आणि प्रेम यांचे गाणे ऐकले आहे का ? चहाच्या कडक आणि वाफाळलेपणातून तयार झालेले गरम प्रेमगीत अनुभवले आहे का ? नसेल तर असे गाणे आता तुमच्या भेटीला आले आहे, ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील उन उन हे गाणे ज्यात प्रेमी युगालांची एक वेगळीच केमेस्ट्री आपल्याला पाहायला मिळते.

 

READ ALSO : गुलाबजामची चव आवडली का? तर मग वय विचारू नका…

अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर मुख्य भूमिकेत आहे, तर मालविका गायकवाड अभिनयात पदार्पण करत आहे. या दोघांवर हे गाणे चित्रित केले आहे.

‘उन उन’ गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी आहेत. तर नरेंद्र भिडे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. वैशाली माडे आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध केले आहे. ‘उन उन व्हटातून गुलाबी धांदल, वाफाळल्या पीरमाची मोगरी मलमल’’ बहुदा पहिल्यांदाच चहातून प्रेम व्यक्त केलं असेल. चहाप्रेमी तसेच प्रेमी युगुलांसाठी हि चहाची मेजवानी खूपच कडक आहे. चहाला मध्यवर्ती ठेऊन प्रथमच कोणीतरी प्रेमगीत लिहिले आहे. अगदी योग्य संगीताची साथ याला मिळाली त्यामुळे ह्या गाण्याची चाल सतत ओठावर तरळते.

‘मुळशी पॅटर्न’ मधील यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या  ‘आराररारा…..खतरनाक’ या गाण्याने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला. ‘उन उन ‘हे गाणे सोशल मिडीयावर नक्कीच गाजेल यात काहीच शंका नाही. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘आराररारा…..खतरनाक’ हे गाणे, त्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर आणि आता हे ‘उन उन’ हे गाणे यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्कंठा खूपच वाढली आहे.

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचे आहे. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. अतिशय वेगळ्या कथेचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author