खास महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आवडता कार्यक्रम म्हणजेच येतो आहे मराठी कोण होणार करोडपती..!!

खास महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी ज्ञान आणि स्वप्नपूर्ती ह्यांची सांगड घालणारा आवडता कार्यक्रम म्हणजेच येतो आहे मराठी कोण होणार करोडपती..!!

आपण मराठी माणसं, आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सतत काहीतरी धडपड करून बँक बॅलन्स वाढवायचा प्रयत्न करतो आहोत, कोणी लवकर स्वप्नपूर्ती करू शकतो तर कोणी आयुष्य घालवतो. आता हे कशावर अवलंबून आहे तर ज्याच्या त्याच्या ज्ञान आणि कष्ट ह्यांच्या जोरावर. नुसतं ज्ञान किंवा नुसते कष्ट करून स्वप्नपूर्ती होतेच असं नाही. थोडं लक सुद्धा आपल्या बाजूने असायला लागतं. काही लोक ते खेचून आणतात तर काही लोक वाट पहातात. पण कधी कधी अशी संधीच चालून येते की झटक्यात माणूस करोडपती होऊ शकतो. खरं आहे ना?.

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

संधी आली की सोडायची नाही. प्रयत्न करायचा की, हीच संधी आहे आपल्या स्वप्नपूर्तीची, आणि लागायचं कामाला. काय काम करायचं? तर मिळेल तेवढं ज्ञान पदरात पाडून घ्यायचं. बुद्धीला धार आणायची. कोणीही कसलाही प्रश्न विचारला तरी त्याचं परफेक्ट उत्तर आपल्याकडे असायलाच पाहिजे. एवढी तयारी करायची. मग बघाच ‘यश’ तुमच्या दारात चालत नाही तर ‘पळत’ येणार. मग चला, उठा, लागा कामाला. संधी येऊ घातली आहे, नुसतं पती नाही तर करोडपती व्हायची ही संधी येते आहे. सोडायची नाही. शाळा कॉलेजमध्ये असताना जसा सपाटून सगळ्या विषयांचा अभ्यास करायचात तसाच पण जनरल नॉलेज चा अभ्यास करायचाय. लक्ष्मी आलीच पाहिजे ह्या जिद्दीने करायचाय.

सोनी मराठी चॅनल वर लवकरच येतो आहे आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम, ” कोण होणार करोडपती “.ही संधी आहे. खास मराठी माणसांसाठी, मराठीतून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना अचूक उत्तरं द्यायची आहेत. जशी जशी अचूक उत्तरं तुम्ही द्याल तशी तशी तुम्हाला मिळणारी रक्कम वाढत जाणार आहे. आणि सगळ्यात शेवटच्या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला करोडपती बनवणार आहे. कोणासमोर बसून तुम्हाला ही उत्तरं द्यायची आहेत हे लवकरच जाहीर होणार आहे, ती व्यक्ती सुद्धा तुमची आवडती व्यक्तीचं असणार आहे त्यामुळे आपणच होणार करोडपती अशा झोकात समोर बसून द्या धडाधड अचूक उत्तरं. जर एखाद्या प्रश्नाला तुम्ही अडला तर तुम्हाला कोणाची मदत मिळणार हेही लवकरच कळणार आहे. मग तर सगळंच सोपं, तर करा तयारी आणि सरळ धडक द्या त्या येणाऱ्या सोन्यासारख्या संधीला. बघूयात ह्यावेळी कोण होणार मराठी करोडपती.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author