रुपेरी पडदा ‘पुल’कित होण्यासाठी सज्ज

रुपेरी पडदा ‘पुल’कित होण्यासाठी सज्ज

 आपल्या कथांमधून, नाटकांमधून, चित्रपटांमधून मनोरंजनाचा खजाना उधळणारे महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘भाई – व्यक्ती कि वल्ली’ याची औपचारिक घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ आणि शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ‘विनोद तावडे’ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. आपल्या विनोदहस्त लेखणीने समस्त महाराष्ट्राला हास्यरसात बुडवून काढलेल्या या अवलियाच्या जीवनक्रमाचा उलगडा करण्याचं शिवधनुष्य उचललेलं आहे महेश वामन मांजरेकर यांनी. “दिग्दर्शक म्हणून काम जरी कठीण असलं, तरी हे काम हवं हवंस वाटणारं काम आहे” असं मांजरेकर स्वतः कबूल करतात.

       ८ नोव्हेंबर १९१९ साली पुलंचा जन्म झाला होता. म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०१९ हे वर्ष पु. ल. देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष असेल. याचंच औचित्य साधून ४ जानेवारी २०१९ रोजी ‘भाई- व्यक्ती कि वल्ली’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. चित्रपटाच्या घोषणेबरोबरच माननीय राज ठाकरे साहेब यांनी हि एक घोषणा केली ती म्हणजे, पुलंनी स्वतःच्या लेखणीने अमर केलेल्या अप्रतिम पात्रांची व्यंगचित्र स्वतः राज ठाकरे रेखाटणार आहेत आणि पुलंच्या जन्मशताब्धी वर्षातच त्यांचं प्रदर्शन हि भरवण्यात येणार आहे.

आनंद इंगळे, अतुल परचुरे यांसारख्या कलाकारांनी आजपर्यंत पु.ल.देशपांडे यांची भूमिका रंगभूमीवर साकारलेली आहे.. पण रुपेरी पडद्यावर पु.ल. साकारण्यासाठी महेश मांजरेकर यांनी ‘सागर देशमुख’ याची निवड केलेली आहे. सागर देशमुखला आपण याआधी ‘हंटर’ आणि ‘वायझेड’ चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे. पुलंच्या पत्नी सुनिताबाईंची भूमिका साकारण्यासाठी गुणी अभिनेत्री इरावती हर्षे यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. बालगंधर्वांच्या भूमिकेत स्वानंद किरकिरे आपल्याला पाहायला मिळतील. तसेच पुलंना जे गुरुस्थानी होते, ज्यांच्याशी त्यांचं मैत्रीच नातं होतं, जे पुलंच्या आयुष्याला कशा न कशा प्रकारे स्पर्शून गेलेले होते, असे अनेक व्यक्ती या चित्रपटाचा हिस्सा असतील. त्यातील भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, बाबा आमटे, जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, दुर्गा भागवत, अशा अनेक व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका साकारण्यासाठी मराठी सिनेसृष्ठीतील दिग्गजांची निवड झालेली आहे.

फाळकेज फॅक्टरी- अ फिल्म मॅनेजमेंट कंपनी आणि ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट कंपनी प्रस्तुत, वैभव पंडित निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांनी लिहिली असून, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिलेले आहेत. रंगभूषेतील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले विक्रम गायकवाड आपल्या रंगभूषा कौशल्याने या चित्रपटातील अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचं रूप त्या त्या कलाकारांना देणार आहेत. तसेच या चित्रपटाला संगीत देणार आहेत अजित परब.

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार, गायक, वादक, नकलाकार असे सर्वगुण संपन्न असलेले आपले लाडके आणि आदर्श पु.लं. कशाप्रकारचं आयुष्य जगले हे रसिकांना अगदी जवळून अनुभवता येणार आहे. आता प्रतीक्षा आहे त्याच क्षणाची जेव्हा त्या हास्यसम्राटाचा जीवनपट रुपेरी पडद्यावर जिवंत होईल आणि आपण सर्व रसिकप्रेक्षक  त्या क्षणाचे साक्षीदार होऊ.

        मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.