आगामी फाईट करेल मराठी चित्रापटसृष्टीतील वातावरण टाईट..!!

आगामी फाईट करेल मराठी चित्रापटसृष्टीतील वातावरण टाईट..!!

 

मराठी चित्रपट सृष्टीची स्वतःची आपली एक शैली आहे. बॉलिवूड प्रमाणे चकाचक सिनेमे इथे नसतात. दक्षिणेकडचे ढिशुम ढिशुम पट सुद्धा इथे कमीच. वैचारिक, विनोदी, सस्पेन्स, थ्रिलर अशा धाटणीचे सिनेमे मात्र मराठी चित्रापटसृष्टी गाजवत आहे आहेत.

एखादा खेळ किंवा एखाद्या खेळाडूंवर किंवा मारधाडीवर ज्या प्रमाणे बॉलिवूड मध्ये चित्रपट बनतात आणि धो धो पैसे कमावतात त्याच प्रमाणे आता मराठी फिल्मी वर्तुळात एका आगामी फाईट पटाची सध्या जोरदार चर्चा आहे.

‘फाईट’ नावाचा नवीन सिनेमा सध्या येऊ घातला आहे. ह्या मध्ये नवीन चेहरे देखील नावारूपाला येण्यास सज्ज आहेत.

दिग्दर्शक जिम्मी मोरे ह्यांनी ‘जीत’ नावाच्या एका डॅशिंग हिरोच्या आगमनाचे शिंग फुंकले आहे. ह्या सिनेमात जुने मातब्बर चेहरेही आहेतच. त्यामुळे नवीन जुन्यां अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पहावयास मिळेल असे वाटते..

ह्या सिनेमाचे मुख्य आकर्षण मात्र स्टंटबाजी आणि मारधाड हेच आहे. दिग्दर्शकांचे म्हणणे देखील असेच आहे की मराठी प्रेक्षकांना नवनवीन फाईट सीन्स ची मेजवानी ह्या सिनेमा तर्फे देण्यात येईल. ह्यात असे काही स्टंटस किंवा फायटिंग ची दृश्ये असतील जी आज पर्यंत मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमात अनुभवली नसतील. मराठीमध्ये ऍक्शनपटाचे युग आणण्याचा त्यांचा मानस आहे.

 
 

READ ALSO :  तुंबाड बघून दांडी गुल झाली? आता येतोय तुंबाड भाग दुसरा.. डरते राहो..!!

तसेच ह्या चित्रपटाची गोष्ट एका ‘बॉक्सर’ च्या आयुष्यावर बेतलेली आहे. त्यामुळे बॉक्सिंग आणि त्यातील बारकावे, बॉक्सिंग चे काही सामने देखील ह्यात बघायला मिळण्याची शक्यता आहेच. दंगल चित्रपटातून ज्या प्रमाणे कुस्ती ह्या मर्दानी खेळाला लोकांसमोर आणून प्रसिद्धीचे वलय दिले गेले त्याच प्रमाणे ‘फाईट’ हा सिनेमा बॉक्सिंग ला प्रकाशझोतात आणेल. तसेच हा मराठी चित्रपट असल्यामुळे बॉक्सिंग च्या प्रसंगांबरोबर महाराष्ट्रीय वातावरणही बघायला मिळेल.

ह्या चित्रपटाचा हिरो सातारा जिह्यातील दाखवण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे ह्यातील एका डायलॉग मुळे मध्यंतरी काही वादही पेटला गेला होता. ह्या वादामुळे नवखे दिग्दर्शक आणि हिरो असलेल्या फाईट चित्रपटाला थोडी प्रसिद्धी मिळण्यास मदतच झाली असे म्हणता येईल.

ज्या प्रमाणे हा फाईट सिनेमा मराठी मध्ये ऍक्शन पटाची मुहूर्तमेढ रोवणार आहे त्याचप्रमाणे जीत ह्या नव्या चेहऱ्याबरोबर मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन ऍक्शन हिरो देखील मिळणार आहे. व्यायामानी पिळदार झालेले शरीर आणि फायटर ला शोभेल असा चेहरा असलेला हिरो ह्या सिनेमाला लाभला आहे.

ह्या चित्रपटाचे फाईट मास्तर फिरोज खान म्हणतात की ह्या सिनेमामध्ये तीच तीच रटाळ मारामारी नसून हाय फाय आणि नव्या स्टाईलची फायटिंग चित्रित केली गेली आहे. मराठीत अशी हाणामारी कधीही न पाहिल्याने ती प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.  ह्या सिनेमाच्या कथानकबद्दल आपल्याला अजून माहिती त्याचे ट्रेलर आल्यावरच कळू शकेल पण फाईट च्या निमित्ताने मराठी मातीतला एक ऍक्शन पट बघायची संधी मात्र रसिकांना मिळणार हे नक्की..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author