खान्देशी भाषा आणि संस्कृतीचं ‘मोल’ पटवून सांगणारा चित्रपट लवकरच येतोय

खान्देशी भाषा आणि संस्कृतीचं ‘मोल’ पटवून सांगणारा चित्रपट लवकरच येतोय

महाराष्ट्र फक्त पैशाने श्रीमंत नसून महाराष्ट्राला विविध भाषांची हि समृद्धी लाभलेली आहे. महाराष्ट्रात मराठीखेरीज ३८ अन्य भाषा बोलल्या जातात. त्यातील अहिराणी या खान्देशच्या बोली भाषेमध्ये एक नवा कोरा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे. ज्याचं नाव आहे ‘मोल’. नुकतंच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये करण्यात आलं. मराठी आणि अहिराणी या दोन्ही भाषांमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

एक कृषी शास्त्रज्ञ आपला मोठा हुद्दा, गडगंज पगार या गोष्टींमध्ये न रमता, लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याच्या जिद्दीने स्वतःच्या गावी परततो. इथे आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खऱ्या आणि भीषण समस्यांशी दोन हात करता करता.. त्या कृषी शास्त्रज्ञाला कोणत्या आपदांचा सामना करावा लागतो आणि त्यासाठी त्याला काय ‘मोल’ चुकवावं लागतं या सगळ्याच परिस्थितींचा घटनाक्रम म्हणजे या चित्रपटाचं कथानक  होय. राजकारण, व्यसनमुक्ती, अशा अनेक मुद्द्यांना हा चित्रपट स्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळेल. दिग्दर्शकाने खान्देशची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात खान्देशच्या संपन्न संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आहे. या चित्रपटातील गाणी हि सद्यस्थितीवर अतिशय मार्मिक भाष्य करतात. ‘मेंढर मेंढर’ या गाण्यामधून भारतीय जनता कशी डोळे झाकून एखाद्या नेत्यावर विश्वास ठेवते, तसेच ५००-१००० रुपयांसाठी आपलं मत विकते आणि त्याचे परिणाम पुढचे ५ वर्ष भोगते. यासारखा गंभीर मुद्दा त्यातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.

या चित्रपटात किशोर कदम, मिलिंद शिंदे यांसारखे मराठीतील प्रथितयश अभिनेते तर आहेतच, पण खान्देशातील स्थानिक ५० अभिनेत्यांनाही यात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. चित्रपटात नायकाची भूमिका साकारत आहेत स्वतः निर्माते-दिग्दर्शक योगेश कुळकर्णी आणि  नायिका साकारत आहेत शितल अहिरराव. त्यांच्यासोबत नीला पाटील-गोखले, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या हि महत्वाच्या भूमिका आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतील.

पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती केलेली आहे योगेश कुलकर्णी यांनी. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलंय अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी, तर बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी या चित्रपटातील गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार यांचं असून, संकलन केलंय विजय खोचीकर यांनी. चित्रपटाची पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी आणि प्रदीप कंखरे यांचे आहेत.

“पिंजरेवाली मुनिया” आणि “हमके माफी दै दा” या दोन भोजपुरी चित्रपटांची यशस्वीरीत्या निर्मिती केल्यानंतर निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते-गीतकार योगेश कुळकर्णी मातृभूमीचे ऋण आपल्या मराठी आणि अहिराणी भाषेतील चित्रपटाने फेडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तरी “जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये जाऊन पाहावा,” अशी विनंती योगेश कुळकर्णी यांनी महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना केलेली आहे.

मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडीं आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.